आईबाबांकडे काही मागा, ते म्हणतात, ‘नंतर बघू’- असं का?

आई बाबांना काहीही मागितलं तरी ते नाहीच म्हणतात. माझ्या गोष्टी त्यांना इतक्या कमी महत्त्वाच्या का वाटतात?

आई-बाबांचं भांडण होतं, तेव्हा घाबरलेल्या मुलांनी काय करायचं असतं?

आई बाबा भांडतात. त्यांच्या भांडणाने घाबरलेल्या मुलांनी काय करायचं? आई बाबांच्या भांडणात मुलांचा दोष असतो का?

नो, नाय, नेव्हर! आई बाबांना काहीही विचारा त्याचं उत्तर हेच का?

मोठी माणसं सारखी ‘नको. नाही. आत्ता नको. कधीच नको…’ या मोडमध्ये का असतात? जे करावंसं वाटतं ते का करु दिलं जात नाही.

मेंदूला मोबाइलवरचे खेळ खेळायला का आवडतात?

मोबाइल गेम खेळायला आपल्याला कितीही आवडत असलं तरी त्यामुळे आपला तोटा होतो, हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल? नाही ना? मग हे वाचा!

व्हॅन गॉ सारखं निसर्गाचं आणि स्वत:चं चित्र काढा!

व्हॅन गॉ या चित्रकाराचं नाव तुम्ही ऐकलंय ना? त्याच्या चित्रातली सूर्यफुलं, पिवळा रंग, रात्रीचं आकाश बघितलंय तुम्ही? त्याने काढलेली सेल्फ पोर्ट्रेट्सही प्रसिद्ध आहेत. त्याच्यासारखी चित्र काढायला आवडतील तुम्हाला?

आईबाबा सारखे भांडतात, मी अभ्यास कसा करु?

आमच्या घरात आईबाबांची सतत भांडणं होतात. त्यामुळे माझं अभ्यासात लक्षच लागत नाही. घरातल्या वातावरणामुळे मला काहीच करावंसं वाटत नाही. मी काय करु? – गौतमी, पुणे.      आई बाबांच्या भांडणाचा तुला त्रास होतो, तुझ्या अभ्यासावर, तुझ्या मूडवर त्याचा परिणाम होतो हे तू आई बाबांना सांगितलं आहेस का? सांगितलं नसशील तर नक्की सांग. ते भांडत असताना तुला … Read more

जेवताना मोबाईल बघणं मेंदूला का आवडत नाही?

  आपण जेवतो तेव्हा शरीरात काय घडतं? तुला हे आठवतंय ना की, प्रत्येक घास तोंडात घालतो, त्यात आपल्या तोंडातली लाळ मिसळली जाते. वेगवेगळ्या टप्प्यावर शरीरातले विविध स्त्राव त्या अन्नामध्ये मिसळले जातात, यालाच पचनक्रिया म्हणतात. आता समजा आपण जेवतो आहोत, त्या वेळेला एखादी कारस्थानयुक्त मालिका चालू असेल, कोणीतरी कोणाला तरी शिव्या देतो आहे. कोणीतरी रागावतो आहे, … Read more

काय बिघडलं सुट्टीत नुसताच टीव्ही बघितला तर?

उन्हाळ्याची सुट्टी ही वर्षातली एकमेव मोठ्ठी सुट्टी. दिवाळी, ख्रिसमसला शाळेला सुट्टी असते पण ती तशी पटकन संपते, उन्हाळ्याची सुट्टी मात्र चांगली महिना दीड महिना असते, त्यामुळे वर्षभर जे जे करायला मिळत नाही ते या सुट्टीत करायला सगळ्यांनाच आवडतं. तुला टीव्ही पहायला आवडतो, वर्षभर शाळेमुळे तुला टीव्ही पहायला मिळत नाही असं तू म्हणतोस आणि शाळा असते … Read more

काही न करता शांत बसलं तर काय चुकलं?

मी कधीकधी काहीही न करता शांत बसून राहाते. मला चांगलं वाटतं. पण घरचे लगेच रिकामीच का बसलीये म्हणून ओरडतात, कामाला लावतात. रिकामं बसून राहाण्यात काय प्राॅब्लेम आहे? – प्राची हातोले, अमरावती काही न करता शांत बसून राहाणं यात तसं म्हणशील तर चूक काही नाही. आपण सतत काही तरी करतच राहायला हवं, सतत बिझी असायलाच हवं … Read more

आई म्हणते चित्र काढणं म्हणजे वेळ वाया घालवणं… हे खरं आहे का?

मला चित्रं काढायला खूप आवडतं, मी दररोज चित्र काढतो, शाळा सुरु असते तेव्हाही अभ्यासातून वेळ काढून चित्र काढतो, पण माझी आई म्हणते चित्र काढण्यात वेळ कशाला घालवतोस, चित्र काढून कोणी मोठं होत नाही, मी आईला काय सांगू? – साहिल, गडचिरोली.    तुला चित्र काढायला आवडतात, तू रोज चित्र काढतोस आणि मुख्य म्हणजे शाळा सुरु असते … Read more