ग्रीन वॉरियर्स

वाशिम जिल्ह्यात माहुली गावचे निखिलकाका वन विभागात काम करतात. त्यांनी या उन्हाळ्यात चक्क पंधरा लाख बिया जमवल्या. एका झाडाची हजार झाडं करायची जादू त्यांना येते. तुम्हालाही येईल.
डायमंडबॅक टेरापिन ही कासवांची विशिष्ट प्रजाती. समुद्र किनाऱ्यावर आधी पाहिलेली ही कासवं गेली कुठे? या प्रश्नाच्या शोधातून जियाला या कासवांना वाचवण्याचं उत्तरही सापडलं. ते कोणतं?
वाया जाणाऱ्या अन्नातून अन्नाची नासाडी तर होतेच शिवाय त्याचा पर्यावरणावरही घातक परिणाम होतो. वाया जाणाऱ्या अन्नाची समस्या सोडवून फायदा देणारा उपाय शोधणारा जपानमधला एक यशस्वी प्रयोग.
ज्या वयात गोष्टीची पुस्तकं वाचायची त्या वयात करणव रस्तोगी हा मुंबईचा मुलगा पुस्तकं लिहून क्लायमेट चेंज वाॅरियर्स घडवण्याचे काम करत आहे.
विहान ताल्याने काढलेल्या फोटोला मानाचा पुरस्कार तर मिळालाच पण फोटोमागील विहानच्या दृष्टिकोनाचं कौतुक जगभरात होत आहे.
फुलपाखरांची संख्या कमी होत राहिली तर हळूहळू सर्वच नष्ट व्हायला लागेल. हे कळल्यापासून डंकन जर्मन फुलपाखरांची बाग तयार करण्यात गुंतून गेलाय!
जास्तीत जास्त झाडं लावता यावीत यासाठी लेसिन फुटबाॅलचा सामना खेळताना जास्तीत जास्त गोल करण्याचा प्रयत्न करत असतो.
आपली पृथ्वी वाचवा, त्यासाठी काहीतरी करा असं जगातल्या नेत्यांना धाडसानं सांगणाऱ्या लिसिप्रियाला काॅप२८ परिषदेतून बाहेर काढलं गेलं. तिचं खरंच काय चुकलं?