शाळेत, ग्राऊंडवर, रिक्षात, बसमध्ये तुम्हालाही असं कुणी चिडवतं का? तुमच्या दिसण्या-वागण्यावरुन टोमणे मारतं का? मग तुम्ही काय करता, दुर्लक्ष करता की रडत बसता?
मैदानावर खेळायला जाणं म्हणजे पडझड होते. लागतं सवरतं. पण त्या वेदना कुरवाळून समजा घरीच बसून राहिलात तर पडून पुन्हा उभं राहण्याचं धाडस कसं येईल तुमच्यात?
गोष्ट इमोशन्सची - डाॅ. श्रुती पानसे (मेंदू आणि शिक्षण अभ्यासक) आई नको नको म्हणत होती, तरीही सौरभ खूप वेळ उन्हात खेळला. चेहरा लाल होईपर्यंत आणि शरीर घामाघुम होईपर्यंत तो खेळतच होता . अनेक हाका मारल्या तरी पण त्याने दाद दिली नाही. सगळेच खेळत होते पण बाकीचे जण दुपार झाल्यानंतर घरी गेले आणि संध्याकाळी परत खेळायला ... Read more