fun
जुने खेळ, नवी गंमत!
सारखे सारखे तेच तेच कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स, रिमोटवरची खेळणी खेळून कंटाळा आला? मग जरा जुने खेळ पुन्हा खेळून बघा, तुम्हाला खूपच मज्जा येईल!
स्वयंपाकघराशी संबंधित म्हणी!
भाषा फक्त शाळेतच शिकायची असते असं कुठे आहे? किचनमध्ये लुडबुड करतानाही भाषेतल्या गमतीजमती शिकता येतात, बघा बरं प्रयत्न करुन!
वाचा पाडगावकर आजोबांच्या धम्माल कविता!
मराठीच्या पुस्तकात तुम्हाला मंगेश पाडगांवकर या आजोबांनी लिहिलेली एखादी कविता आहे का? मग ती वाचल्यावर त्यांच्या इतर कविता वाचाव्या असं तुम्हाला वाटलं तर हे ‘निळं निळं फुलपाखरू’ नक्की वाचा!
मातीच्या रंगांची चित्र काढणारा युसुके असाई!
पूर्वी माणूस गुहेत राहायचा तेव्हा गुहेच्या भिंतीवर तो चित्र काढायचा हे तुम्ही वाचलंय ना इतिहासाच्या पुस्तकात? मातीचे रंग वापरुन भिंतींवर चित्र काढणारा एक चित्रकार जपानमध्ये आहे. त्याच्याबद्दल वाचा आणि त्याच्यासारखी चित्रही काढून बघा!
जगात पहिलं दही कसं लागलं असेल?
दही लावायचं असेल तर विरजण हवं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा दही लावलं गेलं असेल तेव्हा तर विरजण नसेल! मग कसं लागलं असेल ते दही? आहे की नाही सॉलिड शंका? चला, शोधूया उत्तर!
मित्रमैत्रिणींसाठी हँडमेड बुकमार्क!
पुस्तक वाचताना मध्येच ब्रेक घेतो तेव्हा आपलं पान परत लगेच सापडण्यासाठी त्यात आपण एखादी खूण ठेवतो. खूण म्हणून हाताला लागेल ते काही तरी ठेवण्यापेक्षा स्वतः तयार केलेला बुकमार्क ठेवला तर?
चहा करुन घ्या, रोबोकडून!
खऱ्याखुऱ्या शाबासकीसाठी खोटा खोटा चहा! – विनय. र. र. एक कप चहाचे महत्त्व अनेक स्तरांवर आहे. विशेषतः भारतीय संस्कृतीत – तो पाहुणचार, आपुलकी दाखवतो. कोणाच्या कंजुषीबद्दल तक्रार करायची असेल तर साधा एक कप चहासुद्धा विचारत नाहीत असे म्हणतात. बाकी चहा स्फूर्ती आणि ताजेपणा देतो, चहा मधील कॅफिन शरीर आणि मनाला ऊर्जा देतात. थकवा आल्यावर … Read more
आमच्या सुटीत आई बाबा सुटी का नाही घेत? त्यांना सतत कामच का असतं?
सुटीत आम्ही घरी ,आई बाबा कामावर.अख्खी सुटी वाया गेली ना त्यामुळे! आई बाबांशिवाय सुटीची मजा कशी येणार? पण आई बाबांना सुटी कोण देणार?
गावाकडे नेवून घरात बसवता.. मग कशाला जायचं गावाला?
गावाला नेऊन आई बाबा मोकळं खेळू देणार नसतील तर गावाला जाण्यात कसली आलीये मज्जा’? त्यापेक्षा गावाला न गेलेलंच बरं!