स्वयंपाकघरात प्लॅस्टिकचा चाॅपिंग बोर्ड असेल तर आई बाबांना आधी तो बदलायला सांगा…

तुमच्या घरात जर भाज्या चिरण्यासाठी, फळं कापण्यासाठी प्लॅस्टिकचा चाॅपिंग बोर्ड असेल तर भाज्या आणि फळांसोबत तुमच्या पोटात प्लॅस्टिकही नक्की जात असेल. ते कसं?

तुमच्या आवडत्या फुटबॉल टीम्सच्या कॅप्टन्सची गोष्ट!

आपल्याला मेस्सी, रोनाल्डो आवडतात. त्यांच्यासारखी एक तरी किक आपल्याला मारता यावी असं वाटतं, पण त्यांचे कष्ट माहिती असतात का? नाही ना? मग ही डॉक्युमेंटरी नक्की बघा.

सायकल प्रेमाची गोष्ट!

बघा – एलिझाबेथ एकादशी!  – अर्चना भट. आज आपण परेश मोकाशींचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा सिनेमा बघणार आहोत. सिनेमा घडतो पंढरपूरात. ह्यात ज्ञानेश, त्याची बहीण झेंडू, त्यांची आई आणि आजी आहेत, दोघांना बाबा नाहीत पण त्यांच्याकडे बाबांनी बनवलेली सायकल आहे. सायकलीचं नाव आहे ‘एलिझाबेथ’! त्यांना ती इतकी आवडते, की पंढरपूरच्या मंदिरातले भटजी जितक्या प्रेमाने विठ्ठलाला आंघोळ … Read more

चहा करुन घ्या, रोबोकडून!

खऱ्याखुऱ्या शाबासकीसाठी खोटा खोटा चहा! – विनय. र. र.   एक कप चहाचे महत्त्व अनेक स्तरांवर आहे. विशेषतः भारतीय संस्कृतीत – तो पाहुणचार, आपुलकी दाखवतो. कोणाच्या कंजुषीबद्दल तक्रार करायची असेल तर साधा एक कप चहासुद्धा विचारत नाहीत असे म्हणतात. बाकी चहा स्फूर्ती आणि ताजेपणा देतो, चहा मधील कॅफिन शरीर आणि मनाला ऊर्जा देतात. थकवा आल्यावर … Read more

वाचा एका बिबट्याची गोष्ट!

वाचा, विलास मनोहर यांनी लिहिलेलं – नेगल – मेघना भुस्कुटे   ‘नेगल’ हे आदिवासींच्या भाषेतलं बिबट्याचं संबोधन. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे भारतातल्या हेमलकसा नावाच्या गावात आदिवासींच्या मदतीसाठी जाऊन राहिले. त्यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात त्यांच्यासह त्यांचे मित्र आणि सहकारी विलास मनोहर हेही होते. घनदाट जंगल आणि वन्य पशुपक्ष्यांचा धोका, वीज किंवा वैद्यकीय मदत यांसारख्या … Read more

आईच्या उपासाला द्या मस्त सरप्राईज!

आईचा उपास आहे? मग करा दह्यातला साबुदाणा! आरती परिचारक घरात कोणाचा ना कोणाचा एक दिवस तरी उपास असतोच. ज्या दिवशी घरातल्या कोणाचा उपास असेल त्या दिवशी आई आदल्या दिवशीच साबुदाणा भिजवते. मग तोच साबुदाणा आपण वापरून मस्तपैकी उपासासाठी थंडगार असा दही साबुदाणा केला तर.. आई पण खुश होईल. तिलाही चवीत आणि कामात बदल होईल. शिवाय … Read more

मेंदू, जीभ आणि पोट यांचं नातं काय?

मेंदू, जीभ आणि पोट यांचं नातं काय? डॉ. श्रुती पानसे आपल्या जिभेवर खूप साऱ्या रुचिकलिका असतात. रुचिकलिका याचा अर्थ ज्यामुळे जिभेला चव कळते. या रुचिकलिकांमुळे सतत काहीतरी वेगळं खावसं वाटतं, ज्या अतिशय आवडीच्या गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा खाव्याशा वाटतात. जेव्हा त्यांना छान खायला मिळतं तेव्हा त्या मेंदूकडे ‘आता माझं समाधान झालं. मला छान वाटतं … Read more

करा स्वीट ब्रेड रोल्स!

करा स्वीट ब्रेड रोल्स! आरती परिचारक घरी असलं की सारखी तुमची ‘ मला कंटाळा आलाय’ ची भुणभुण सुरु असेल ना. खेळून दमलं तरी तुम्हाला अजून काहीतरी करायचंच असेल ना?‍ एक सोपी आयडिया. कंटाळा आला की सरळ उठून स्वयंपाकघरात जायचं. आणि छोट्या मोठ्या कामांमध्ये आईची मदत करायची. गॅस न वापरता सोप्या पाककृती करायच्या. आपणही खायच्या आणि … Read more

तुम्हाला किती नातेवाईक आहेत हे मोजलंय का कधी? ते कसं मोजणार?

आपल्याला सख्खे, चुलत, मानलेले असे भरपूर नातेवाईक असतात.पण मोजकेच माहिती असतात.फॅमिली ट्री काढा म्हणजे सर्व नातेवाईक माहिती होतील.