तुमच्या आवडत्या फुटबॉल टीम्सच्या कॅप्टन्सची गोष्ट!

तुमच्या आवडत्या फुटबॉल टीम्सच्या कॅप्टन्सची गोष्ट!

- डॉ. अस्मी अच्युते.

दोस्तांनो, तुम्हाला वर्गाचं माॅनिटर व्हायला, नाटकात मुख्य पात्र - राजा/राणी, राजकुमार/ राजकन्या  व्हायला किंवा खेळाच्या टीमचा कॅप्टन व्हायला मिळालं तर किती भारी वाटतं ना!! सगळे आपलं ऐकतात, आपण सगळ्यांना काहीतरी सांगतो ह्याची मजा पण वाटते.

पण गंमत बघा, आपण कोणीतरी महत्वाचे झालो की आपल्याला भरपूर मेहनत सुध्दा करावी लागते... म्हणजे नाटकातलं मुख्य पात्र असलो की खूप डायलाॅग्ज पाठ करायला लागतात, स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन झालो की आपल्याला आधी आपला खेळ सुधारायला लागतो.

मग तुमच्या लाडक्या फुटबॉल टीम्सच्या कॅप्टन्सला तर किती कष्ट करावे लागत असतील! मेस्सी, रोनाल्डो, नेमार... ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, फुटबॉल वर्ल्डकप मॅच बघायला आपल्याला धमाल येते पण फुटबॉल खेळणं किती अवघड असतं हे तुम्हाला माहिती आहेच! एवढं भलं मोठं मैदान, त्यावर सतत इकडून तिकडे पळायचं, एकीकडे बॉलवर लक्ष ठेवायचं, पास द्यायचा, आपल्या टीमला जिंकून द्यायचं. तुमचे आवडते खेळाडू उगाच एवढे फेमस नसतात, त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत असते.

सगळ्यांच्या लाडक्या खेळाडूंची, वेगवेगळ्या फुटबॉल टीम्सच्या कॅप्टन्सची मेहनत, त्यांचे कष्ट, त्यांचा रोजचा सराव पहायचा असेल तर “कॅप्टन्स ऑफ द वर्ल्ड “ ही डाॅक्यूमेंटरी नक्की बघा.