पुस्तक बोअर झालं तर पुस्तक बदला पण वाचन सुरुच ठेवा!

टी.व्हीवर एखादा सिनेमा पाहताना कंटाळा आला तर आपण टी.व्ही पाहाण्याचं सोडत नाही ना. तसंच पुस्तकांच्या बाबतीतही करायचं असतं.

राजा राणीची नव्हे देश घडण्याची गोष्ट वाचा!

इतिहास म्हणजे केवळ राजे, राण्या, त्यांच्यातले युध्द, लढाया एवढाच नसतो. इतिहासाची धुळाक्षरे ही पुस्तकं त्या पलिकडची, आधुनिक भारताच्या घडण्याची गोष्ट सांगतात.

चाची आणि रमरती खऱ्या आहेत की भूत? वाचा कहानिया जो शुरु नहीं हुई!

चाचीच्या घरात कबुतर आहे,सोन्याची वीट करणारे कबुतर सुद्धा आहे. सोन्याचे अंडी देणारी कोंबडी,गोफण,कुत्रा,पोहण्याचे पंख वापरुन उडणारा मासा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात रहस्य आहे

सूर्याकडे निघालेल्या एका धुमकेतूचा प्रवास. एक मजेदार वैज्ञानिक गोष्ट

बर्फ आणि धुळीपासून तयार झालेला एक धुमकेतू. एकदा इतर ग्रहांची नजर चुकवून तो थेट सूर्यालाच भेटायला निघतो. तो तिथपर्यंत खरंच पोहोचतो का?

दोन घट्ट मैत्रिणींमध्ये काय बिनसतं वाचा ‘सुर्की आणि तिर्की’मध्ये!

गोष्टीचं पुस्तक वाचायला आवडतं ना?माधुरी पुरंदरे यांचं सुर्की आणि तिर्की हे पुस्तक वाचा. हे पुस्तक म्हणजे गोष्ट आणि चित्रांची सुटीतली मेजवानीच आहे.

माणूस कसा घडला? देश -संस्कृती-पैसा कसे निर्माण झाले?

माकडाचा माणूस होण्याची गोष्ट मोठी रंजक आहे. ती वाचण्यासाठी कहाणी मानवप्राण्याची हे पुस्तक वाचायला हवं.

हरिणीचं अनाथ झालेलं पाडस आणि ज्योडीच्या मैत्रीची मजेशीर गोष्ट

पाडस म्हणजे माणूस आणि प्राणी यांच्यातील मैत्री,निसर्ग आणि माणसातला झगडा,तडजोड यांची गोष्ट. ती यंदाच्या सुटीत वाचायलाच हवी!