तुम्ही काय खेळता?

सुट्टी असो की शाळा, खेळ म्हणजे तुम्हा मुलांचा जीव की प्राण! हो ना? तेच तेच खेळ खेळून तुम्हाला कंटाळा येतो? मग यावर उपाय काय? शोधा, म्हणजे सापडेल!

वाळूत खेळण्यासाठी स्पेशल दिवस! किल्ले बांधा, चित्र काढा, धम्माल करा!

वाळूत खेळल्याने किती भारी वाटतं हे वाळूत खेळून बघितल्याशिवाय कसं कळेल? यासाठीच तर आहे ‘नॅशनल प्ले इन द सॅण्ड डे’ हा स्पेशल दिवस.

मोठी माणसं खेळण्याला टाइमपास म्हणतात. आता आम्ही खेळायचं पण नाही?

ठरवल्याप्रमाणे अभ्यास केला नाही, त्याऐवजी थोडा वेळ मित्रासोबत खेळलं तर त्यात आई बाबांनी रागावण्यासारखं एवढं काय घडलं?

सतत मोबाइल गेम खेळलं तर काय बिघडलं? आई बाबा एवढे चिडतात का?

सारखे गेम खेळलं तर काय बिघडतं असं म्हणून आईबाबांशी वाद घालणाऱ्या मुला-मुलींसाठी सतत गेमिंग का बरं करू नये; याची दहा कारणं…

नाटक एक नंबर झालं पण बक्षिस मात्र तिसरं मिळालं. हे असं का झालं?

पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारं अथर्वच्या ग्रूपचं नाटक उत्तम सादर झालं. पण या नाटकाला पहिलं बक्षीस मात्र मिळालं नाही. अथर्वच्या ग्रूपचं काय चुकलं?

चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी मुलांनी रचला अशुभविवाह!

कोविड काळापासून महाराष्ट्रात अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण वाढले. याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी शाळा आणि मुलं प्रयत्न करत आहेत.

ती फक्त २वर्षांची आहे पण घोडा चालवते. खेळण्यातला नाही खराखुरा!

एक २ वर्षांची मुलगी मात्र सर्व मुलांमध्ये वेगळी ठरते. तिला घोडे खूप आवडतात. इतके की तासनतास घोड्यांसोबत खेळते आणि घोडाही चालवते. तेही न घाबरता.

सुटीत शिबिराला जाणं गरजेचंच असतं का? सुटीत नुसतं खेळूच दिलं तर?

सतत सारखं कशाला शिकायचं? शाळा सुरु असतांना शिका आणि सुट्टी लागल्यावरही शिबिरात जाऊन शिका! काय कटकट आहे! सुट्टीत नुसतं खेळू द्या की मला.”