
Image: omo.com
समुद्र किनारी गेल्यावर पाण्याशी खेळताना जितकी मजा येते तितकीच मजा वाळूत खेळतानासुध्दा येते. या वाळूत खेळण्याची मजा प्रत्येकाने कधी ना कधी नक्कीच अनुभवलेली असणार. ऑगस्ट महिन्यात ११ तारखेला संपूर्ण जग वाळूत खेळण्याची मजा अनुभवतं, हे तुम्हाला माहित आहे का? नॅशनल प्ले इन द सॅण्ड डे' या नावाने हा दिवस साजरा केला जातो. एक दिवस वाळूत राहून भरपूर खेळण्याचा, वाळूचा आनंद घेण्याचा हा दिवस. 'नॅशनल प्ले इन द सॅण्ड डे' या दिवसामागे नेमका इतिहास नाही. नेमकं कोणी कधी सुरु केलं याची तारीखवार नोंद नाही. पण २००० साली ' नॅशनल डे कॅलेण्डर ' या वेबसाइटवर अनौपचारिक दिवसांच्या नोंदीत ११ ऑगस्ट या दिवसासमोर 'नॅशनल प्ले इन द सॅण्ड डे' हे दिन विशेष नोंदलं गेलं. हा दिवस ना शासकीय आहे, ना खासगी, ना कोणत्या संस्थेने सुरु केला आहे. पण तरीही हा दिवस जगभरात साजरा केला जातो. घराच्या बाहेर पडा. मस्त वाळूत जा. वाळुचा स्पर्श अनुभवा, आनंद घ्या हा संदेश देणारा दिवस केवळ वाळूच्या सहवासाचा निखळ आनंद घेण्यासाठीच जगभरात साजरा केला जातो.
हा दिवस ना शासकीय आहे, ना खासगी, ना कोणत्या संस्थेने सुरु केला आहे. पण तरीही हा दिवस जगभरात साजरा केला जातो. घराच्या बाहेर पडा. मस्त वाळूत जा. वाळुचा स्पर्श अनुभवा, आनंद घ्या हा संदेश देणारा दिवस केवळ वाळूच्या सहवासाचा निखळ आनंद घेण्यासाठीच जगभरात साजरा केला जातो.
हे वाचा!
कसा साजरा करतात नॅशनल प्ले इन द सॅण्ड डे?

Image: airtransat
हे वाचा!
'नॅशनल प्ले इन द सॅण्ड डे' का साजरा करतात?

Image : freepik
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact