
मी सारखा मोबाईलवर गेम खेळत असतो, म्हणून माझा बाबा मला फार रागावतो. पण मला हे कळत नाही, की सतत गेमिंग केल्याने काय होतं?
- अमेय कुरतडकर, नवी मुंबई
सतत गेमिंग केल्याने सगळ्यात पहिल्यादा काय होतं तर मोबाईल डिपेन्डन्सी येते. ज्याला ऍडिक्शनही म्हटलं जातं. त्यामुळे सतत गेमिंग करणं आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलं नाही.
हेही वाचा!
मोठ्या माणसांचा राग आला तर त्यांना सांगायचं कसं? एक भारी आयडिया आहे!
सतत गेमिंग केल्याने काय होते
१. सतत गेमिंग केल्याने फक्त गेमिंगचं करत राहावंसं वाटतं. मग अभ्यास मागे पडू शकतो.
२. बाहेर खेळायला जाण्यापेक्षा गेमिंग करावं असंच वाटायला लागतं. मित्र मैत्रिणींशी खेळण्यापेक्षा गेमिंग करावं वाटू शकतं. अशाने जवळचे मित्र मैत्रिणी दुरावू शकतात.
३. डोळे, पाठ, मान, बोटं यांना त्रास होतो. ते थकतात.
४.पाठीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डोळे कोरडे पडल्याने जळजळतात. इतरही शरीरिक त्रास होऊ शकतात. वजन वाढू शकतं.
५ .मित्र मैत्रिणींबरोबर खेळण कमीकमी होत जातं आणि पुढे पुढे त्यांच्याशी खेळायचा कंटाळा येऊ शकतो.
६. गेमिंग करायला मिळाल नाही तर चिडचिड, संताप, राग येण्याचीही शक्यता असते.
७. गेमिंगमधल्या लेव्हल्स पार करायला जमल्या नाहीत तर त्याचा ताण येऊ शकतो.
८. गेमिंगमध्ये आलेल्या अपयशाचा परिमाण अभ्यासातल्या यशापयशावर होऊ शकतो. आपल्याला काहीच जमत नाही असं वाटू शकतं. पण खरंतर असं काहीही नसतं.
९. गेमिंग करता येणं न येणं याच्याशी तुमच्या हुशारीचा संबंध लावणं चुकीचं आहे, पण तसंच केलं जातं आणि निराशा येते.
१०. खरंतर गेमिंगचे विशेष फायदे नाहीतच, मग त्यासाठी किती वेळ द्यायचा हेही तुम्हा मुलांनी ठरवण्याची वेळ आली आहे. बरोबर ना!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


