मित्र मैत्रिणींप्रमाणे मलाही मोबाइल हवा. पण घरचे नाहीच म्हणतात!

सगळ्यांकडे मोबाइल असलेला पाहून आपल्याकडे असावा असं वाटणं साहजिक आहे. पण लहान वयात स्वत:चा मोबाइल घेऊन काय करणार हा विचार करायला हवा!

मी बाहेर जात असेल तर आई बाबांना का सांगू?

मोठी माणसं कुठे बाहेर जात असतील तर घरातल्यांना कुठे जात आहेत, कधी येणार हे सगळं सांगून जातात. मग मुलांनीही असंच वागायला हवं ना!