एकदा काय झालं

जमीरदादाच्या हे नक्की लक्षात आलं होतं, की सायली आणि तिचे आईबाबा भूभूशी वाईट वागले आहेत आणि आता मात्र ते भूभूकडे बोट दाखवतायत. जमीरदादाला खरं म्हणजे सायली आणि तिच्या आईबाबांचा खूप राग आला होता. त्यांच्यामुळे भूभूची काहीही चूक नसतांना त्याला चिडका कुत्रा ठरवलेलं होतं. पण जमीरदादा शहाणा होता.
सायलीच्या आईबाबालाही वाटायला लागलं होतं, की आपण सायलीच्या हट्टाला बळी पडून उगीच कुत्रं आणलं. आता त्याचं करणार कोण? भूभूला आणायच्या आधी सायलीने जोरात सांगितलं होतं, की त्याचं सगळं मी करीन. पण...
सायली तिच्या मागणीवर ठाम होती. आणि शेवटी, वाढदिवसाच्या आदल्या संध्याकाळी तिचं रडणं थांबेना म्हंटल्यावर आईबाबाने शोधाशोध आणि मग धावपळ करून तिला हवं असलेलं वाढदिवसाचं गिफ्ट शोधून काढलं.
शेतातल्या काका काकूंनी दिलेला खाऊ खाऊन आत्तूच्या मागे स्कूटर वर बसून घरी जातांना त्याच्या मनात एक प्लॅन तयार झाला होता. 
ईशान उभा होता त्या टोमॅटोच्या झाडाच्या खोडाशी काहीतरी वळवळलं, म्हणून तो दचकून मागे झाला. त्याने वाकून बघितलं, तर झाडाच्या खोडापाशी एक गांडूळ जमिनीतून बाहेर आलं. ते बघून ईशान ईईईईईईई करून ओरडणार तेवढ्यात ते घाईघाईने परत आत गेलं. दुसरीकडून दुसरं गांडूळ बाहेर आलं. तेही परत आत गेलं. गांडूळं अशी जमिनीतून नुसती आतबाहेर का करतायत ते ईशानला ... Read more
आत्तूने तिच्या आईबाबांना सांगितलं आणि ती ईशानला घेऊन शेतात गेली. ईशानला कळेना की आपल्याला इथे कशाला आणलंय?
कचराकुंडीवर कुजलेलं शिळं अन्न किडे का खातात ते ईशानला कळेचना. आत्तू म्हणाली, “कारण या किड्यांचं तेच काम असतं.” “काय?” “ओला कचरा खायचा, त्याचे तुकडे करायचे आणि त्याचं विघटन लौकर होण्यासाठी लागणारी रसायनं त्यावर सोडणं. हे किडे असतात म्हणून कचरा लौकर नष्ट होतो. ते नसते तर माणसाने तयार केलेला कचऱ्याचा ढीग कधी नष्ट झाला असता कोण ... Read more
दुपारचे चार वाजले तसे आत्तू आणि ईशान तयार झाले आणि आत्तूच्या स्कूटरवर बसून निघाले. घरातून निघाल्यावर थोडं अंतर गेल्यावर त्यांना एक कचराकुंडी लागली. आत्तूने तिथे स्कूटर थांबवली. ईशानला कळेना की कचराकुंडीपाशी आपलं काय काम आहे? पण आत्तू उतरली म्हणून तोही उतरला आणि तिच्यापाठोपाठ कचराकुंडीच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. तिथे सगळ्या प्रकारचा कचरा होता. भाज्यांची ... Read more