एकदा काय झालं

“आई…!” १० वर्षांची सई मोठ्यांदा ओरडली.“काय झालं??” असं म्हणून आई हातातलं पुस्तक खाली ठेऊन घाईघाईने आली. “माझा नवीन फ्रॉक बघ ना कसा फाटून गेलाय!” सईने तिचा नवीन फ्रॉक डोळ्यांसमोर धरला होता आणि त्यातून तिला पलीकडची आई स्पष्ट दिसत होती. कारण त्या फ्रॉकला मध्यावर वेडंवाकडं पण चांगलंच मोठठं भोक पडलं होतं. “असा कोणी कापला माझा फ्रॉक?” ... Read more
“मुद्दाम नाही केलं म्हणजे काय? चुकून केलंस? असं कोणी चुकून इतक्या वस्तू फाडतं का? आणि समजा तू चुकून केलंस तरी माझी पुस्तकं, बूट आणि फ्रॉक तर फ़ाटलाच ना?”“हो मला माहितीये…” उंदीर अगदी गरीबड्या आवाजात म्हणाला, “पण मी खरंच तुझं नुकसान करण्यासाठी नाही केलं.””“हो का?” सई उपरोधिकपणे म्हणाली, “मग का केलंस? सांग ना आता. सांग!”“ते मी… ... Read more
सईची खडखड आवाजाने झोपमोड होऊन उठली तेव्हा ती तिच्या खोलीत झोपलेली होती. आणि तिला स्वप्नही तिच्या खोलीचंच पडलं होतं. आणि स्वप्नात पडलेला खडखड आवाज मात्र जागं झाल्यानंतर पण येतच होता. त्यामुळे सई सॉलिड कन्फ्यूज झाली. काय खरं आणि आणि काय स्वप्न तेच तिला कळेना. दोन मिनिटांनी जरा नीट स्वच्छ जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं की ... Read more
दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिघंही अपेक्षेने पिंजऱ्याकडे गेले, पण छे! पिंजऱ्यात उंदीर तर नव्हताच, पण मुंग्यांची भलीमोठी रांग तिथे आली होती. आता सकाळच्या घाईच्या वेळेत त्या मुंग्या घालवण्याचं अजून एक काम वाढलं. आणि शिवाय उंदराने हॉलमधल्या दिवाणावरची चादर कुरतडली होती ते वेगळंच! मग त्या रात्री सईने पिंजऱ्यात रुमाल ठेवला… तो तसाच! एक दिवस पोळीचा तुकडा ठेवला, ... Read more
सई आणि उंदीर आता चर्चा करायची सोडून भांडणाच्या मोडवर गेले होते. उंदीर म्हणत होता की त्याने दात घासायला सईच्या वस्तू फाडल्या, पण त्याला सईने ब्रश आणि पेस्ट देऊ केला त्याला मात्र तो नाही म्हणाला होता. मग सई पण वैतागली.“मग कसे दात घासावे लागतात? सांग ना… का तू मला शेंड्या लावतोयस? तू ऍक्च्युअली पुस्तकं आणि बूट ... Read more