हाता-पायात ताकद आणण्यासाठी घरच्या घरी चढा डोंगर!

एखादा डोंगर चढून आल्यावर मस्त फ्रेश वाटतं ना. घरातल्या घरातही तुम्हाला असं वाटू शकतं. सोबत हातापायाची ताकदही वाढते.

उठाबशा काढा पण शिक्षा म्हणून नाही तर व्यायाम म्हणून!

एका जागी बसून बसून ज्यांचा ज्यांचा गोल गरगरीत चेंडू झालाय त्यांच्यासाठी उठाबशा काढणं म्हणजे उत्तम व्यायम आहे. या व्यायामाला स्क्वॉट्स म्हणतात.

व्यायामाचा कंटाळा लगेच घालवण्यासाठी डान्स करा. हाही एक व्यायामच आहे!

डान्स करणं हा उत्तम व्यायाम आहे. वेडेवाकडे हातपाय हलवत ज्याला नाचता येते तोच खरा डान्सर. मग डान्स करण्याचा व्यायाम तर जमायलाच हवा!