
तुम्ही ट्रेकिंगला कधी गेला आहात? डोंगर वगैरे चढला आहात? काय भन्नाट मजा येते ना?
आणि काही काही ठिकाणी जेव्हा डोंगराची एखादी उभी चढण, छोटासा सरळसोट भाग, तेव्हा तो चढून जाताना एखादवेळेस तुमची फॅ फॅ ही झाली असेल..
म्हणजे चढणीचा हा टप्पा आता चढायचा तरी कसा? मग तुम्ही तुमच्या आसपास त्या चढणीला कुठे खाचा आहेत का, तिथे पाय ठेवता येईल का, त्यावर बोटं रोवून वर जाता येईल का, असा अंदाज घेऊन चढणीचा हा टप्पा तुम्ही निश्चितच पार केला असेल.
आज आपल्याला हाच व्यायाम करायचा आहे. चलो डोंगर चढनेको!..
मला माहीत आहे, बाहेर इतकं सॉलिड ऊन आहे आणि ही कुठे ट्रेकिंगला जायचं म्हणतेय, हाच विचार तुमच्या डोक्यात आला असेल. पण आपल्याला आज खरोखरच ट्रेकिंग, माऊण्टेनिअरिंग करायचंय. तेही घरच्या घरी!
हेही वाचा!
स्वत:च्या हाताने चाट करुयात का?
काय करायचं?-
१ . जमिनीवर आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय टेका.
२. मनातल्या मनात असा विचार करा, ही जमीन आडवी नसून उभी भिंत आहे आणि आपण सुपरमॅन आहोत!
३ . आता चढायला लागा ही भिंत.
४. आधी हाताच्या कोपराजवळ आपला एक गुडघा वाकवून पुढे घ्या.
५ . मग हात पुढे घेऊन दुसरा पाय. बघा, ट्रेकिंगचा फिल तुम्हाला येतो की नाही ते!
६ . हो, अख्खा डोंगर आत्ता एका दमात आपल्याला चढून जायचा नाहीए. आज थोडा चढून बघा, नंतर हळूहळू प्रॅक्टिस वाढवा.
७. यामुळे तुमच्या हातापायात ताकद येईल. त्यांच्यातलं कोओॅर्डिनेशन वाढेल. नंतर काही दिवसांनी खरोखरचा डोंगरही तुम्ही एकदम इझिली चढून जाल!
- तुमची ‘डोंगरचढी’ मैत्रीण,ऊर्जा


