नवीन गावाशी कट्टी घेतलेल्या चिन्मयला भेटायचंय? त्यासाठी पाहा किल्ला सिनेमा

आईच्या बदलीमुळे नवीन गावात राहायला आलेला चिन्मय उदास असतो. एकटा असतो. पण नंतर त्याला मित्र भेटतात आणि चिन्मयची सर्व गोष्टच बदलते.

मशीन आणि माणूस यांच्यातल्या संघर्षात कोण जिंकेल?

फॅक्ट्रीचा मालक लोकांकडून मशीनसारखे काम करुन घेत असतो तर भटक्या झालेला चार्ली चॅप्लीन त्याच्या अचाट शारीरिक हालचालीतून पोट धरुन हसायला लावतो.

छोट्याशा नीनवर मोठी जबाबदारी. ती अननसाचं आइस्क्रिम कसं विकेल?

कधी शाळेतही न गेलेली नीनची आई. छोट्याशा नीनला स्वत:चे प्रश्न कसे सोडवायचे याचा धडा देते. लहानग्या नीनला आई काय सांगते ते कसं समजतं?

गोष्ट डाॅ. अब्दुल कलाम आवडणाऱ्या छोट्या कलामची!

राजघराण्यातला रणविजय आणि ढाब्यावर काम करणारा छोटू एकमेकांची मदत कशी काय करु शकतात? यासाठी ‘आय ॲम कलाम’ हा चित्रपट पाहायला हवा!