फ्लेमिंगो; भटकणारा देखणा पक्षी. तुम्ही याला किती ओळखता?

उंच मान आणि लोंबकळणारे लांब पाय यामुळे उडताना फ्लेमिंगो हे पक्षी जरा बेढबच दिसतात. मात्र शरीरावर असलेल्या आकर्षक रंगांमुळे त्यांना देखणेपण येते.

चेंडूप्रमाणे फळं वर उडवून खाणारा धनेश म्हणजे झाडं लावणारा पक्षी

चेंडूसारखे फळ हवेत उडवून तोंडात झेलण्याच्या धनेशच्या या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे जंगलात झाडांची संख्या वाढण्यास मदत होते.

एका सेकंदात वीस वेळा टकटक करणारा सुतार आहे जंगलाचा डाॅक्टर

सुतार पक्ष्याची जीभ त्याच्या चोचीच्या तिप्पट लांबीची असते आणि गळ्याच्या आतमधून वरच्या दिशेला कवटीच्या वरून नाकाच्या आतल्या बाजूपर्यंत आलेली असते. 

स्विफ्ट पक्षी वर्षातले १० महिने न थांबता न थकता उडू शकतात!

पृथ्वीवरील सर्वात वेगाने उडणारा पक्षी म्हणून स्विफ्ट ओळखला जातो. पण या पक्ष्याच्या हवेतल्या कारनाम्यांमुळे संपूर्ण जगाला स्विफ्टबद्दल कुतुहल वाटतं.