टाईम्पास

खेळण्यातील सेल संपले की आपण ते कचऱ्यात टाकून देतो. पण कचऱ्यात टाकलेले हे सेल आपल्या पोटात जातात, हे माहितीये का तुम्हाला?
हातात रंग घेतल्यावर, चित्रांमध्ये रंग भरताना आपल्याला आनंद होतो . प्रत्येक रंगामुळे आपला मूड वेगळा होतो. रंगामध्ये , रंगाच्या भाषेमध्ये जादू लपलेली आहे!
खाण्याचे पदार्थ खराब होतात पण मधाचे तसे नाही. हजारो वर्षांपूर्वीचा मध आजही खाण्यायोग्य असू शकतो. ही जादू नसून यामागे शास्र आहे. ते काय?
बोटांचे ठसे जसे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात तसे जिभेचेही असतात की जिभ सगळ्यांची सारखीच असते? बोटांच्या ठशाप्रमाणे जिभेचेही ठसे घेतात का?
“आमचा पतंग आभाळात गेला तर आम्ही पेच खेळू… आणि त्यात आम्ही हरू…” रिया म्हणाली. “त्याची काळजी तुम्ही करू नका.” कबुतर म्हणालं, “तुम्ही जर नायलॉन मांजा वापरणार नाही असं प्रॉमिस केलंत तर तुमचा पतंग आभाळात जाईल आणि तुम्ही पेच जिंकाल!” “कसं काय?” “ते आमच्यावर सोडा…” रिया आणि अयानने एकमेकांकडे बघितलं आणि म्हणाले, “मग आम्ही तसं प्रॉमिस ... Read more
जमीरदादाच्या हे नक्की लक्षात आलं होतं, की सायली आणि तिचे आईबाबा भूभूशी वाईट वागले आहेत आणि आता मात्र ते भूभूकडे बोट दाखवतायत. जमीरदादाला खरं म्हणजे सायली आणि तिच्या आईबाबांचा खूप राग आला होता. त्यांच्यामुळे भूभूची काहीही चूक नसतांना त्याला चिडका कुत्रा ठरवलेलं होतं. पण जमीरदादा शहाणा होता.
सायलीच्या आईबाबालाही वाटायला लागलं होतं, की आपण सायलीच्या हट्टाला बळी पडून उगीच कुत्रं आणलं. आता त्याचं करणार कोण? भूभूला आणायच्या आधी सायलीने जोरात सांगितलं होतं, की त्याचं सगळं मी करीन. पण...
सायली तिच्या मागणीवर ठाम होती. आणि शेवटी, वाढदिवसाच्या आदल्या संध्याकाळी तिचं रडणं थांबेना म्हंटल्यावर आईबाबाने शोधाशोध आणि मग धावपळ करून तिला हवं असलेलं वाढदिवसाचं गिफ्ट शोधून काढलं.