ईशानने घाबरून उद्या मारून सोफ्यावरची कव्हर्स अस्ताव्यस्त करून टाकली होती आणि आत्तूने आत येऊन सामान ठेवेपर्यंत आई पुन्हा स्लीपर हातात घेऊन तो किडा शोधायला हॉलमध्ये फिरत होती.
उंदराचे दात वाढायचे थांबत नाहीत. ते सतत वाढतच राहतात आणि दात घासून झिजवले नाहीत तर उंदीर मरतो. आणि शिवाय ते दात झिजवण्याचं काम सोपं नसतं हे कळल्यावर सईला उंदराबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती. पण वस्तू कुरतडण्यात रिस्क काय आहे ते तिला कळत नव्हतं. उंदीर तिला सांगायला लागला.“अगं, आम्ही कुठेही बाहेर दिसलो की माणसं आम्हाला मारायचा ... Read more
दुसऱ्या दिवशी उठल्याबरोब्बर सईने बाबाला सांगितलं की उंदराचं औषध आणू नको, उंदराचा पिंजरा आण. बाबाला काही ती आयडिया फारशी आवडली नाही. कारण उंदीर पिंजऱ्यात सापडणं इतकं काही सोपं नसतं हे त्याला माहिती होतं. पण सई त्याचं म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. शेवटी बाबाला तिच्याशी वाद घालायचा कंटाळा आला आणि दोघांमध्ये तह झाला. त्यांचं ठरलं, की ... Read more
सईने पटकन हातातला टॉर्च पेटवला आणि टेबलावरच्या खुडखूड आवाजावर प्रकाशाचा झोत टाकला आणि ती सॉलिड दचकली. तिच्या टेबलवर एक भलामोठा उंदीर बसला होता आणि चवीने तिचं पुस्तक कुरतडत होता. सई तो उंदीर बघून इतक्या जोरात दचकली, की ती जोरात किंचाळली आणि आईबाबा धावत आले.“काय झालं?”“का किंचाळलीस?”“स्वप्न पडलं का?”“टॉर्च का लावला आहेस? लाईट गेलेत का?”असे अनेक ... Read more
“आई हे बघ.” आईचं बोलणं मधेच थांबवत सई म्हणाली, “माझा फ्रॉक फाटला नाहीये, कोणीतरी कुरतडलाय!”“कशावरून?”“हे बघ ना.” सईने जमिनीवरून तिच्या फ्रॉकच्या छोट्या छोट्या चिंध्या उचलल्या. त्या मगाशी फ्रॉकवरच असणार. पण खुर्चीवरून फ्रॉक उचलला तेव्हा त्या खाली पडल्या असणार. सईने त्या चिंध्या आईला दाखवल्या. मग आईलापण पटलं की हा फ्रॉक कोणीतरी कुरतडल्यासारखा दिसतोय खरा. तरी त्यावर ... Read more
“आई…!” १० वर्षांची सई मोठ्यांदा ओरडली.“काय झालं??” असं म्हणून आई हातातलं पुस्तक खाली ठेऊन घाईघाईने आली. “माझा नवीन फ्रॉक बघ ना कसा फाटून गेलाय!” सईने तिचा नवीन फ्रॉक डोळ्यांसमोर धरला होता आणि त्यातून तिला पलीकडची आई स्पष्ट दिसत होती. कारण त्या फ्रॉकला मध्यावर वेडंवाकडं पण चांगलंच मोठठं भोक पडलं होतं. “असा कोणी कापला माझा फ्रॉक?” ... Read more
“मुद्दाम नाही केलं म्हणजे काय? चुकून केलंस? असं कोणी चुकून इतक्या वस्तू फाडतं का? आणि समजा तू चुकून केलंस तरी माझी पुस्तकं, बूट आणि फ्रॉक तर फ़ाटलाच ना?”“हो मला माहितीये…” उंदीर अगदी गरीबड्या आवाजात म्हणाला, “पण मी खरंच तुझं नुकसान करण्यासाठी नाही केलं.””“हो का?” सई उपरोधिकपणे म्हणाली, “मग का केलंस? सांग ना आता. सांग!”“ते मी… ... Read more
सईची खडखड आवाजाने झोपमोड होऊन उठली तेव्हा ती तिच्या खोलीत झोपलेली होती. आणि तिला स्वप्नही तिच्या खोलीचंच पडलं होतं. आणि स्वप्नात पडलेला खडखड आवाज मात्र जागं झाल्यानंतर पण येतच होता. त्यामुळे सई सॉलिड कन्फ्यूज झाली. काय खरं आणि आणि काय स्वप्न तेच तिला कळेना. दोन मिनिटांनी जरा नीट स्वच्छ जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं की ... Read more