टाईम्पास

दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिघंही अपेक्षेने पिंजऱ्याकडे गेले, पण छे! पिंजऱ्यात उंदीर तर नव्हताच, पण मुंग्यांची भलीमोठी रांग तिथे आली होती. आता सकाळच्या घाईच्या वेळेत त्या मुंग्या घालवण्याचं अजून एक काम वाढलं. आणि शिवाय उंदराने हॉलमधल्या दिवाणावरची चादर कुरतडली होती ते वेगळंच! मग त्या रात्री सईने पिंजऱ्यात रुमाल ठेवला… तो तसाच! एक दिवस पोळीचा तुकडा ठेवला, ... Read more
सई आणि उंदीर आता चर्चा करायची सोडून भांडणाच्या मोडवर गेले होते. उंदीर म्हणत होता की त्याने दात घासायला सईच्या वस्तू फाडल्या, पण त्याला सईने ब्रश आणि पेस्ट देऊ केला त्याला मात्र तो नाही म्हणाला होता. मग सई पण वैतागली.“मग कसे दात घासावे लागतात? सांग ना… का तू मला शेंड्या लावतोयस? तू ऍक्च्युअली पुस्तकं आणि बूट ... Read more