हाय! मी ऊर्जा!
आपण तिसरी-चौथीतून पाचवी-सहावीत गेलो ना, की लगेच आपल्याला ऐकावं लागतं, 'आता तू मोठा झालास (किंवा मोठी झालीस). नीट शहाण्यासारखं वाग!' आणि आपण मोठे झालो म्हणून उत्साहाने काही वेगळं करायला जावं तर सगळे म्हणतात. 'तुला कसं कळणार? लहान आहेस अजून!' थेट अगदी दहावी- अकरावीत आईपर्यंत लहान-मोठ्याचा हा घोळ आपला चालूच !
आपण ना धड लहान असतो, ना पुरेसे मोठे, घरात तर जाम गोंधळ! आई-बाबा कन्फ्यूज झालेले असतात. एखाद्या रविवारी सकाळी उशिरापर्यंत मस्त गुरगुट्न झोपू म्हटलं तर पांघरूण खेचून
आई म्हणते, 'उठ आता! लहान आहेस का झोपायला?' आणि आपल्याला अज्जिबात न पटलेल्या एखाद्या मुद्यावर वेगळं मत मांडायला जावं तर कुणीतरी कान खेचून म्हणणार.
'मोठ्यांशी असा वाद घालावा का लहान मुलांनी?" शाळेतसुद्धा तेच. आपण अजूनही लहानच आहोत म्हणून काही शिक्षक इतकं बाळबोध सावकाश शिकवतात की कंटाळा येऊन झोपच लागते यायला आणि काही शिक्षक इतके सॉलीड स्पीडमध्ये सुटतात की सगळी विमानं जातात आपल्या डोक्यावरून!
काही वाचायला जावं, तर अगदीच जुन्या-पान्या राजा-राणीच्या गोष्टी वाचा, चित्र रंगवा, कोडी सोडवा किंवा मग थेट कॉलेज कॅम्पसमधलेच विषय. टी. व्ही. पाहावा, तर कार्टून नेटवर्क किंवा मग थेट वेब सीरिजच. आता या सगळ्यांच्या अधेमधे आपण असतो ना? - पण मग आपल्यासाठी काहीच का नसतं? आपले विषय डिस्कस करणारं, मनातलं बोलण्याची संधी देणारं, प्रश्न पडतात खूप त्यांची उत्तरं देणारं आणि धम्माल मज्जा करणारंसुद्धा म्हणून मी आलेय ऊर्जा तर मग, भेटूया !
'लोकमत' आणि 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन"ने सुरु केलेली नवी वेबसाईट.
आता तुम्ही विचाराला, की हे 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन" काय्ये ? - ते मी सांगीनच लवकर !
आता यापुढे रोज आपण भेटू शकतो. लहान मुलांसाठी लेख-गोष्टी लिहिणारी छापणारी मोठ्ठी माणसं 'बरं का मुलांनो... म्हणून लाडात येऊन गळ्यातच पडतात आपल्या आणि सारखं काहीतरी शिकवत राहातात.
'लोकमत'ची नवी वेबसाईट असले ना, तरी मी तसलं काही मुळीच करणार नाहीये. आपण छान दोस्ती करू एकमेकांशी आणि मस्त गप्पा मारू
तुमची,
ऊर्जा