संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी करा चाॅकलेट मग केकचा मस्त खाऊ!

स्वयंपाकघरातली लुडबुड

- जान्हवी सावजी शिखरे

हॅलो छोट्या दोस्तांनो,कसे आहात? संध्याकाळी खेळायला जायच्या आधी जराशी भूक लागलेली असते, अशावेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा व झटपट होणारा "चॉकलेट मग केक" आपण तयार केला तर ?
यासाठी आपल्याला बेकिंग - म्हणजे भाजणे/बेक करणे ही गोष्ट शिकता येईल..आपल्या नोंदवही/स्क्रॅपबुकमध्ये ही गोष्ट नोंदवता येईल.यातले महत्वाचे घटक ,जे केकला फुलवण्याचे काम करतात ते म्हणजे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा - हे सुपरहिरोच की..
यासाठी मात्र घरात मायक्रोव्हेव असायला हवा,जो बऱ्याच घरी असतो.

हेही वाचा!

दिसायला देखणा, चवीला चटकदार चीज- चेरी -पायनापल

केक करताना यातलं साहित्य अगदी योग्य प्रमाणात घ्यायला लागतं,नाहीतर केक बिघडलाच म्हणून समजा..यात आपण मोठा चमचा म्हणजे पोहे खायचा आणि लहान चमचा म्हणजे चहा पूड/कॉफीच्या डब्यात असतो तेवढा चमचा घेऊ... म्हणजे प्रमाण चुकणार नाही.. साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे
मायक्रोव्हेव सेफ मग
दोन मोठे चमचे साखर/गुळ पावडर, दोन मोठे चमचे तेल (रोजचे). तीन मोठे चमचे दही, एक मोठा चमचा दूध, १/४ लहान चमचा व्हॅनिला इसेन्स वरील सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्यायचं. नंतर यात तीन मोठे चमचे गव्हाचे पीठ/मैदा १/२ मोठा चमचा कोको पावडर, एक चिमूट बेकिंग पावडर, एक चिमूट बेकिंग सोडा
हे सर्व कोरडं साहित्य वरील ओल्या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित हलवून मायक्रोव्हेवला दोन मिनिटे बेक करून घ्यावं की केक तयार होतो.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact