मी काय करु?
- गौरी पटवर्धन

खराब झाली की वस्तू फेकून द्यायला हवी. नवीन वस्तू विकत आणायला हवी अशी गरज आता तुम्हाला वाटतेय का? आधीचा लेख वाचला असेल तर नक्कीच वाटणार नाही. वस्तू खेळणी दुरुस्त करण्याची इच्छा आता तुमच्याही मनात नक्कीच निर्माण झाली असेल. त्यामुळे दुरुस्तीविषयी आणखी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
कुठलीही वस्तू किंवा खेळणं दुरूस्त करण्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे नेमकं काय बिघडलं आहे हे शोधून काढणं. काही वेळा हे एकदम सोपं असतं तर काही वेळा अत्यंत वेळखाऊ पण इंटरेस्टिंग असतं. एखाद्या वस्तूतून कुर्र कुई आवाज येत असेल तर तो नेमका कुठून आणि कशाचा येतोय हे शोधावं लागतं. काही गंजलय का? बिजागरीत तेल घालायला हवं का? की कशाची लेव्हल ऍडजस्ट करायला हवी? की अजून वेगळा प्रॉब्लेम आहे हे शोधावं लागतं.
हेही वाचा!
नळाचा वाॅशर अन बल्ब बदला..किरकोळ दुरुस्ती करायला शिका!
एकदा प्रॉब्लेम सापडला की तो सोडवायचा कसा यावर डोकं चालवायला लागतं. एखादा सुटा भाग विकत आणायला हवा आहे का? तर तो कुठे मिळतो? कितीला मिळतो? त्यात ऑनलाइन आणि ऑफलाईन किंमतीत काही फरक आहे का? तो पार्ट बदलण्यासाठी किंवा दुरूस्त करण्यासाठी आपल्याकडे हत्यार आणि तेवढी माहिती आहे का? माहिती नसेल तर तिची ट्युटोरियल युट्यूब वर आहे का? काही वेळा एखादी वस्तू काही केल्या मिळत नाही. ती मिळवण्यासाठी लागणारी चिकाटी हे एक वेगळं आणि फार महत्त्वाचं कौशल्य आहे. थोडक्यात सांगायचं, तर नवीन वस्तू आणण्यापेक्षा जुनी वस्तू दुरूस्त करणं हे अत्यंत कटकटीचे काम आहे. पण तरी एकदा तरी ते करून बघाच. कारण त्यातून मिळणारा आनंद एका वेगळ्याच पातळीवरचा असतो.
कारण आपण वस्तू दुरूस्त करून वापरतो तेव्हा आपण निर्माण होणारा कचरा कमी करत असतो. आणि आज आपल्या पृथ्वीसाठी सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


