कुरकुरीत बिस्किटांचा तयार कराचटपटीत खाऊ. मोनॅको टाॅपिंग्ज बनवून बघा!

स्वयंपाकघरातली लुडबुड

- प्रद्युम्न पंडित

Image: google

संध्याकाळी भूक लागली की नुसती बिस्किटं खाऊनही कंटाळा येतो .बिस्किटांशिवाय दुसरा खाऊ खाण्याची इच्छा होते. पण वेगळा खाऊ मिळण्याची शक्यता अजिबात नसते. अशा वेळेस बिस्किटं तर बिस्किटं असं म्हणून त्याचाच काही नवीन खाऊ बनवायचा का? माझ्याकडे मोनॅको टाॅपिंग्जची भारी आयडिया आहे. चला करुन पाहायचे का? टेन्शन घेऊ नका. हे करण्यास अतिशय सोपे आहेत.
मोनॅको टाॅपिंग्जसाठी मोनॅको बिस्कीट /खारी बिस्कीट, सॉफ्ट बटर /लोणी चमच्याने पसरवता येईल असे, आवडीनुसार टोमॅटो सॉस, मेयोनेज,चिंच सॉस, चिल्ली सॉस,पिझ्झा सॉस, चीझ क्यूब 2/3,मोठा उकडलेला बटाटा ,कांदा,गाजर,कोबी,शिमला मिरची,हिरवी मिरची,कांदा पात,टोमॅटो आतील बियांचा गर काढून वरील जाड भाग बारीक लांब चिरून, बीट थोडे वाफवून किसून घेतलेले, वाफवलेले स्वीटकॉर्न दाणे अशा मिक्स भाज्या व मायक्रो ग्रीन हर्ब्ज, हे सर्व अगदी बारीक/ चिरून घ्यावं. काळी मिरी पूड,जिरे पूड,इटालियन मिक्स हर्ब्ज ,मीठ,चिमूट साखर आणि बारीक झीरो नंबर शेव /नायलॉन शेव घ्यावी.

हेही वाचा!

संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी करा चाॅकलेट मग केकचा मस्त खाऊ!

टाॅपिंग्ज करताना उकडलेला बटाटा सोलून त्यात सर्व भाज्या, हर्ब्ज, मायक्रो ग्रीन्स बारीक चिरून एकत्र करावं. त्यात सर्व मसाले एकत्र करावे, त्यात अगदी चमचा भर मेयोनेज, पिझ्झा सॉस घालावं. आणि त्यात टॉस करत भाज्या कोट कराव्या.
बिस्कीट टॉपिंग करताना मोनॅको/ क्रॅकर्स सर्व एका मोठ्या प्लेटवर थोड्या अंतरावर पसरवून त्या प्रत्येक बिस्कीट वर थोडे सॉफ्ट बटर लावावे ,मेयोनेज पसरवून त्यावर उकडलेला बटाटा किसून पसरावा ,त्यावर मिक्स भाज्या अर्धा ते एक चमचा प्रत्येक बिस्कीटवर पसरवून घ्याव्यात. सॉस,चटणी वगैरे अर्धा चमचा टाकावी, चीज किसून व बारीक/नायलॉन शेव भूरकावून थोडी सजावट करावी. मस्त चटपटीत क्रंची पौष्टिक ,असे बिस्कीट टॉपिंग तयार होते. अशा प्रकारे विविध टॉपिंगज बनवता येतात.
हॅपी कुकिंग.!!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact