मित्र-मैत्रिणी भरपूर पण त्यात आपला बेस्ट फ्रेण्ड कोणाला म्हणायचं?

आपल्याला कितीही मित्रमैत्रिणी असले तरी जवळचे फार थोडे असतात आणि ज्याला किंवा जिला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणावं अशी तर एखादीच मैत्रीण असते.

माझ्या मैत्रिणीने फक्त माझ्याशीच बोलायला हवं, ती दुसऱ्यांशी का बोलते?

आपली मैत्रिण दुसऱ्या मुलीशी बोलते, तिच्याशी मैत्री करते म्हणून आपण तिच्याशी मैत्रीच तोडणं, तिचा राग करणं हे बरोबर आहे का?

‘ती’ माझी बेस्ट फ्रेण्ड, पण तिची बेस्ट फ्रेण्ड भलतीच कुणी. असं कसं?

आपल्या खास मैत्रिणीची आपल्याशिवाय दुसरी एखादी खास मैत्रिण असू शकते, हे आपल्याला पटत का नाही? आपल्याला मैत्रिणीचा राग का येतो?