सिक्रेट्स

सगळं लक्ष लहान भावाकडे. त्याला काय हवं नको यासाठी सगळेजण धावणार. पण म्हणून घरातल्या मोठ्या मुलांकडे आईबाबांचं दुर्लक्ष होतं का?
आई बाबा भांडतात. त्यांच्या भांडणाने घाबरलेल्या मुलांनी काय करायचं? आई बाबांच्या भांडणात मुलांचा दोष असतो का?
तुम्हा मुलांचा हाच तर प्रॉब्लेम असतो ना, की 'मोठी माणसं फक्त 'सांगतात' आणि मुलांचं काही 'ऐकत'च नाहीत.. पण मी तसं करणार नाही, प्रॉमिस!
मोठी माणसं ओटीटीवर जसा सगळा कंटेंट पाहू शकता तशी मोकळीक मुलांनाही हवी. पण मुलांवर टीव्ही पाहताना बंधनंच जास्त. असं का?
आई बाबा आपल्यापेक्षा लहान भावाचं जास्त ऐकतात याचा अर्थ आई बाबांना आपण आवडत नसतो असं नाही. त्यांच्या वागण्यामागे एक विशिष्ट कारण आहे, ते काय?
शाळा सुरु व्हायचा दिवस जवळ आला म्हणजे नवीन पुस्तकंही येणार! पुस्तकांशी मैत्री झाली की अभ्यास सोपा होतो, पुस्तकांशी मैत्री कशी करायची? अशी!
मी चूकतच नाही असं म्हणणारे कधीच चुका सुधारु शकत नाही. पण चुका स्वीकारल्या तर त्या सुधारण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात!
आमच्या घरात आईबाबांची सतत भांडणं होतात. त्यामुळे माझं अभ्यासात लक्षच लागत नाही. घरातल्या वातावरणामुळे मला काहीच करावंसं वाटत नाही. मी काय करु? - गौतमी, पुणे.      आई बाबांच्या भांडणाचा तुला त्रास होतो, तुझ्या अभ्यासावर, तुझ्या मूडवर त्याचा परिणाम होतो हे तू आई बाबांना सांगितलं आहेस का? सांगितलं नसशील तर नक्की सांग. ते भांडत असताना तुला ... Read more