आपल्या पृथ्वीवर

फक्त चर्चा करत बसू नका, काहीतरी काम करा.. असं जगभरातल्या सरकारांना सांगण्याची हिंमत १२ वर्षांच्या चिमुकलीमध्ये आली कुठून?
आदित्य मुखर्जी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकांच्या घरोघरी जावून, स्टाॅरण्टमध्ये जावून आदित्य नेमकं काय करतो.
'एका वेळी अर्धा ग्लास पाणी' हा नियम पाळला तर आपण वाया जाणारं कोट्यावधी लिटर पाण्याची बचत करु शकतो, हा धडा एका तेरा वर्षाच्या मुलीनं शिकवला.
हस्तीदंताचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी ६व्या ग्रेडमध्ये शिकणाऱ्या टॅजेन यार्डलीने आवाज उठवला. कोण आहे ही टॅजेन यार्डली?
पूर, दुष्काळ,गावातली आजारपणं, मृत्यू हे दृष्टचक्र थांबवायचं असेल तर झाडं लावायला हवीत असं सांगणाऱ्या इस्थरच्या प्रयत्नांची गोष्ट.
निसर्गच आपल्याला खरी ताकद देतो.त्याला वाचवण्यासाठी काहीतरी करावे असं वाटणाऱ्या प्रसिध्दीने झाडं लावायला सुरुवात केली.
दूषित -विषारी पाण्यामुळे लोकं आजारी पडू लागले, मृत्यूमुखी पडू लागले तेव्हा आठ वर्षांची मारी कोपेनी पुढे आली. एवढी हिंमत या लहान मुलीकडे आली कुठून?
झाम्बिया शहरातील मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं, हे ऐकल्यावर साॅयर अस्वस्थ झाली आणि तिने मोहीम उभी केली.