
Image: oprahdaily
फ्लिंट हे अमेरिकेतील मिशीगन राज्यातील एक शहर. फ्लिंट नदीच्या काठावर वसलेलं. शहरात तसं सर्व काही सुरळीत सुरु होतं. पण अचानक फ्लिंट येथील नगरपालिकेने फ्लिंट येथील नागरिकांना विश्वासात न घेता, केवळ पैसे वाचवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत बदलला. हे पाणी दूषित होते. त्यातून लोकांना विषबाधा झाली. यात १२ लोकांचा मृत्यू झाला. फ्लिंट शहरात पाण्याचा प्रश्न पेटला. २०१४ मध्ये ही घटना घडली तेव्ह फ्लिंट शहरात राहाणारी मारी कोपेनी नावाची मुलगी फक्त आठ वर्षांची होती. दूषित पाण्यामुळे लोकं आजारी पडत आहेत हे तिला दिसत होतं. तिच्या स्वत:च्या घरात तिच्या लहान बहिणीला दूषित पाण्यामुळे त्वचेची गंभीर समस्या उद्भवली होती. तिला सतत अंगाला महागडे औषधी मलम लावावे लागत होते. . त्वचा सुरक्षित राहावी म्हणून प्लॅस्टिकमध्ये स्वत:ला गुंडाळून घ्यावं लागत होतं. मारीला तिच्या लहान बहिणीसाठी तसेच शहरातील इतर लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी काम करावंसं वाटत होतं.
हेही वाचा!
शहरातील मुलं पाण्याला घाबरत होती, महिलांना पाणी म्हणजे विष वाटत होतं, हे बघून मारीला आपल्या शहरासाठी, शहरातल्या मुलांसाठी, महिलांसाठी काम करावंसं वाटलं. एवढ्या लहान मुलीचं कोण कशाला ऐकेल असंच प्रत्येकाला वाटत होतं. मारीच्या आईलाही असंच वाटत होतं. पण मारीनं प्रयत्न सोडायचे नाही, असा ठाम निश्चय केला. मारी घराबाहेर पडून लोकांशी बोलू लागली. लोकंही तिच्या बोलण्याकडे लक्ष देवू लागले. बोलणं जर शास्त्रीय माहितीवर आधारलेलं असेल, गंभीर मुद्दे मांडणारं असेल तर मोठी माणसंही लहान मुलांचं ऐकतात, हे मारीने स्वत:च्या उदाहरणाने सिध्द केले होते. मारीने फ्लिंट शहरातील पाण्याच्या प्रश्नाकडे, फ्लिंट शहरातील लोकांच्या हाल अपेष्टांकडे लक्ष वेधण्यासाठी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलं. तेव्हा बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष होते. तिने ओबामा यांना पत्र लिहून त्यांना फ्लिंट शहरात येण्याची, येवून तिला आणि शहरातील नागरिकांना भेटण्याची विनंती केली. ओबामांनी मारीचं पत्र वाचलं आणि ते खरोखर फ्लिंट शहरात आले, मारीला आणि शहरातील नागरिकांना भेटले. त्यांनी शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी १० कोटी डाॅलर्स मंजूर केले. नंतर मारीनं आपलं काम थांबवलं नाही. ती पूर्णवेळ कार्यकर्ता बनून काम करु लागली. फ्लिंट शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येसोबतच महिला मोर्चाची राजदूत झाली. शाळेतील मुलांना शाळेचं साहित्य वाटायचं काम मारी करु लागली.

Image: elle.com
हेही वाचा!
आपण आपल्या शहरातल्या नागरिकांसाठी काम करु शकतो असा विश्वास मारीमध्ये निर्माण झाला होता. जेव्हा आयुष्यात वाईट घडतं तेव्हा नेहेमी चांगल्या गोष्टींकडे बघावं, ते करण्याचा प्रयत्न करावा, असं मारीची आई म्हणायची. मारीनं आईचं वाक्य चांगलंच लक्षात ठेवलं आणि फ्लिंट शहराला मदत करण्यासाठी स्वत:च्या कामातून एक व्यासपीठ उभारलं. या व्यासपिठाच्या माध्यमातून आपण फ्लिंट शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवू शकतो, तसेच जगही बदलू शकतो असं मारी म्हणायला लागली. पत्र लिहून थेट राष्ट्राध्यक्षांनाच फ्लिंट शहरात घेवून आल्याने फ्लिंट शहरातल्या पाणी प्रश्नाकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं. इतर देशातील नागरिकांना या प्रश्नाचं गांभीर्य समजलं. लोकं फ्लिंट शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी देणगी स्वरुपात पैसे देवू लागले. यातून बरीच मोठी रक्कम उभी राहिली. या रकमेतून फ्लिंट शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या गेल्या. जोपर्यंत फ्लिंट शहरातला पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मारी काम करतच राहाणार आहे. अजूनही नगरपालिका देत असलेल्या नळाच्या पाण्यावर लोकांचा विश्वास नाही. येथील लोकं पाण्यासाठी बाटल्यांवरच अवलंबून राहात आहेत.

Image: readworks
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दूषित पाणी असा पाण्याचा प्रश्न केवळ फ्लिंट शहरातच नाही. अमेरिकेतल्या इतर भागातही पाण्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न माध्यमांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं मारीला वाटतं. फ्लिंट शहरातील पाणी प्रश्नावर काम करताना मारीला इतरांचं ऐकून घेण्याची, प्रश्न समजून घेण्याची आणि प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान असतं, ते जाणून घेण्याची शिकवण मिळाली. याच शिकवणीचा वापर करुन मारी एक कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. तिने केलेल्या कामाचं यश म्हणजे फ्लिंट शहरातल्या या १५ वर्षाच्या मुलीची, तिच्या कामाची दखल जगभरातल्या वर्तमानपत्रांनी घेतली आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact