प्रत्येक गोष्ट मी परफेक्टच केली पाहिजे असा काही नियम आहे का? परफेक्ट म्हणजे नक्की काय?

आपण जे केलं ते परफेक्ट आहे की नाही हे कसं ठरवायचं? ते मोजण्याचं काही साधन आहे का? आणि समजा परफेक्ट काम करणं जमलंच नाही तर काय होईल?