PREVIOUSNEXT
“आई…!” १० वर्षांची सई मोठ्यांदा ओरडली.
“काय झालं??” असं म्हणून आई हातातलं पुस्तक खाली ठेऊन घाईघाईने आली.
“माझा नवीन फ्रॉक बघ ना कसा फाटून गेलाय!” सईने तिचा नवीन फ्रॉक डोळ्यांसमोर धरला होता आणि त्यातून तिला पलीकडची आई स्पष्ट दिसत होती. कारण त्या फ्रॉकला मध्यावर वेडंवाकडं पण चांगलंच मोठठं भोक पडलं होतं. “असा कोणी कापला माझा फ्रॉक?” सईने चिडून विचारलं.
“कापला? तुझा फ्रॉक कोण कशाला कापेल? तूच कुठेतरी खेळतांना कशात तरी अडकून फाटला असेल!”

“माझा नवीन फ्रॉक बघ ना कसा फाटून गेलाय!” सईने तिचा नवीन फ्रॉक डोळ्यांसमोर धरला होता आणि त्यातून तिला पलीकडची आई स्पष्ट दिसत होती. कारण त्या फ्रॉकला मध्यावर वेडंवाकडं पण चांगलंच मोठठं भोक पडलं होतं. “असा कोणी कापला माझा फ्रॉक?” सईने चिडून विचारलं.
“कापला? तुझा फ्रॉक कोण कशाला कापेल? तूच कुठेतरी खेळतांना कशात तरी अडकून फाटला असेल!”
“असा कसा फाटेल?” सईने फाटलेला भाग वर धरत विचारलं. आणि तिचं म्हणणं बरोबर होतं. एखाद्या वेळी फ्रॉकचा घेर कशात तरी अडकून थोडासा फाटू शकतो. पण तिचा फ्रॉक चांगला वीतभर फाटला होता. आणि तोही बेल्टच्या अर्धा वर आणि अर्धा खाली! ते बघून आईने पण मान्य केलं की खेळतांना असा फ्रॉक फाटू शकत नाही. पण त्यामुळे सईची चूक नाही हे मान्य करेल तर ती आई कसली? तिने लगेच पुढची शक्यता बोलून दाखवली.
“खेळतांना नसेल फाटला. पण तू हे असे इकडे तिकडे कुठेही कपडे टाकतेस, खुर्चीच्या हातावर, टेबलवर, दारामागच्या खिळ्यावर… आणि बाहेर जातांना घाईघाईने ओढून काढतेस. तेव्हा कुठेतरी खिळा लागला असेल! किती वेळा सांगितलंय तुला? कपडे निदान कपाटात उचलून ठेवत जा…”
अरे देवा! सई तक्रार करायला गेली पण तिच्यावरच उलटी गेम पडली होती. आता विषय फाटलेल्या फ्रॉकला सोडून सईचा गबाळेपणा, खोली न आवरणं, तिला वस्तूंची किंमत नसणं याकडे गेला होता. हे फारच धोकादायक होतं. कारण या दिशेला गेलेला विषय काहीही केलं तरी पुढे अभ्यास न करणं, सगळ्या भाज्या न खाणं यावर जातो हे सईला अनुभवाने माहिती होतं. म्हणजे फ्रॉक फाटला तो फाटला, आणि शिवाय आईची बोलणी खायची?
एरवी सईने आईचं सगळं ऐकून घेतलं असतं. पण आत्ता दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे सईची खरोखर काही चूक नव्हती आणि दुसरं म्हणजे तिच्या फ्रॉकच्या फाटलेल्या भागाचे तुकडे तिला जमिनीवर पडलेले दिसत होते आणि ते चक्क कुरतडून टाकल्यासारखे दिसत होते.

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact