सिक्रेट्स

सिक्रेट गोष्ट सगळ्यांनाच समजली तर काय होतं? पण सिक्रेट गोष्ट सगळीकडे पसरते कशी? सिक्रेट गोष्ट सांगायची तरी कोणाला? कोणी लपवूनच ठेवत नाही!
आम्ही आधी एकमेकांचे चांगले मित्र होतो. पण आता आम्हाला मुलं 'जोडी' म्हणून चिडवतात. आता आम्ही ऐकमेकांशी बोलतच नाही!
आपल्याला कोणी प्रपोज केलं आणि ते कोणाला कळलं तर काय होईल? याचं टेन्शन आहे का तुम्हाला? अशा वेळी काय करायचं?
मुलांना फक्त मित्र असतात आणि मुलींना फक्त मैत्रिणी हे कोणी ठरवलं? एखाद्या मुलाची आणि मुलीची छान मैत्री असू शकत नाही का?
आपले मित्र/मैत्रिण आपल्याला सोडून इतरांशी बोलले तर राग येतो. मैत्री तुटेल का याची भीती वाटते. मला असं वाटणं हे नाॅर्मल आहे का?
ज्यांच्यात आजवर एकदाही भांडण झालेलं नाही असे मित्रमैत्रिणी नसतातच. काही जण कधीतरीच भांडतात आणि काहीजण तर सारखे भांडतात.
जवळच्या मित्र-मैत्रिणीने हात पकडला, खांद्यावर हात टाकला की छान वाटतं. मित्र मैत्रिणींचा स्पर्श हवासा वाटतो. त्यांच्या स्पर्शात असं काय असतं?
हातावर जास्त फ्रेण्डशिप बॅण्ड्स आहे म्हणून खूप मित्र मैत्रिणी आणि हातावर फ्रेण्डशिप बॅण्ड्स नाही म्हणून कोणी मित्रच नाही असं तुम्हाला वाटतं का?