
Image: report.az
ॲमेझाॅन ही दक्षिण अमेरिकेतली नदी. हीची ओळख केवळ अमेरिकेपुरतीच मर्यादित नाही. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत महत्वाची नदी आहे. जगातली सर्वात मोठी नदी म्हणून ॲमेझाॅन नदीची ओळख आहे. जगातल्या इतर कोणत्याही नद्यांच्या तुलनेत ॲमेझाॅन नदीत सर्वात जास्त ताजं पाणी आहे. या नदीतून प्रती सेकंद दोन लाख लिटर्स पाणी समुद्रात येतं. ही नदी पेरु, बोलिविया, व्हेनेझुएला, कोलंबिया, ब्राझील या सहा देशांमधून वाहते. ॲमेझाॅन नदीचं हे एवढं मोठं साम्राज्य आहे. पण दुष्काळामुळे ही नदी कधी नव्हे ती इतकी सुकत चालली आहे. १२० वर्षात पहिल्यांदा ॲमेझाॅन नदीतील पाणी जगाने काळजी करावं इतकं कमी झालं आहे. ॲमेझाॅन नदी आटल्याचा परिणाम लाखो लोकांच्या जगण्यावर झाला आहे. तसेच ॲमेझाॅन नदीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलावरही त्याचा परिणाम झाला आहे.
हेही वाचा!
ॲमेझाॅन नदी आटते तेव्हा..
हेही वाचा!

Image: mymodernmet
ॲमेझाॅन नदी आटल्याचा असाही परिणाम

Image: wired
ॲमेझाॅन नदीतील पाणी कमी झाल्याने या नदीतल्या पोटात असलेल्या दगड गोट्यांचा खजिना उघडा होतोय. प्राचीन काळात दगडावर कोरलेल्या प्रतीमा, चेहरे दिसू लागले आहेत. त्यामुळे प्राचीन काळातील कलाकुसर, त्यामागचा दृष्टिकोन, सांस्कृतिक इतिहास यांचा अभ्यास अभ्यासकांना करता येणार आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact