
Image: .pbs.org
परीक्षा जवळ आल्या तर सिरियसली अभ्यास करायचा असतो. हा नियमच असतो ना.. पण जर परीक्षा तोंडावर असूनही आपण सिनेमा पाहात असू, मित्र-मैत्रिणींसोबत जास्त खेळत असू तर लगेच आपले आई बाबा म्हणतात , ' काय हे परीक्षेचं काही गांभीर्य आहे की नाही?' म्हणजे काय तर परीक्षा जवळ आल्या की परीक्षा असल्यासारखं वागायला हवं. पण असं प्रत्येक बाबातीत होत नाही ना, हाच तर प्रश्न आहे. आता हवामान बदलाचंच उदाहरण घ्या , हवामान बदल याबद्दल सतत बोललं जात आहे, वर्तमानपत्रात बातम्या आणि लेख छापून येत आहे. हवामान बदलाचे परिणाम जगात काही काही भागात दिसू लागले आहेत. ऋतुंचं चक्र बदललं आहे, रोजच्या तापमानातही मोठे बदल जाणवत आहेत. असं असतानाही आजूबाजूला पाहिलं तर हवामान बदलाबाबत काळजीने बोलणारी, त्यासाठी स्वत:हून काही कृती करणारी माणसं मात्र कमी आहेत. आज कोट्यावधी लोकांना हवामान बदलाच्या परिणामांचा फटका बसला आहे,पण तरीही हवामान बदलाविरुध्द पुढे येणाऱ्यांची संख्या मात्र कमी असं का?
हेही वाचा!
लोकांना हवामान बदलाचं गांभीर्य का नाही वाटत?

Image: usatoday
हेही वाचा!
जगातल्या माणसांना मग काळजी कसली आहे?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact