आर्यलंडच्या समुद्रातील माशांनी आपला मुक्काम का हलवला?

Image: .intrafish

आर्यलंड हे युरोपमधील एक बेट. या बेटावरचा दराग मॅकगुईनेस नावाचा तरुण. त्याचा मासेमारीचा व्यवसाय. शाळा संपल्यानंतर दराने मासेमारी करण्याचा व्यवसाय निवडला. कारण मासेमारी करुन भरपूर पैसे मिळतात हे त्याने बघितलं होतं. येथील समुद्रात चांगल्या प्रतीचे मासे  आणि त्यांना बाजारात मिळणारा भाव यामुळे दराकने मासेमारी करायला सुरुवात केली. त्याच्याकडे मासेमारी करण्यासाठीची बोटही आहे. हा व्यवसाय सुरु केल्यावर सुरुवातीची वर्षं त्याला मासेमारीतून चांगला फायदाही झाला. पण यंदा म्हणजे २०२३ मध्ये चित्र वेगळं आहे. दराग मोठा चिंतेत आहे. तो मासेमारी करायला समुद्रात जातो, पण त्याला पुरेसे मासेच मिळत नाही. रोज माशांची संख्या घटतेच आहे, हे त्याच्या लक्षात येतंय. मासेच मिळत नसल्याने त्याला ते विकून फारसे पैसेही मिळत नाहीये. यापुढील काळात आपल्याला मासेमारी बंद करावी लागेल की काय, अशी भीती दरागला वाटू लागली आहे.

हेही वाचा!

कुठे बरं गेले असतील मासे?

दराग म्हणतो मासेच गळाला येत नाही. कसे बरं येतील, कारण आर्यलंडच्या समुद्रातील माशांनी आपला मुक्काम दुसरीकडे हलवला आहे.

समुद्राचं तापमान एवढं वाढलंय की ही उष्णता मासे सहन करु शकत नसल्याने मासे हळूहळू आर्यलंडमधील समुद्रातून निघून जात आहे.

पाण्याचं वाढलेलं तापमान सहन न झाल्याने आर्यलंडमधून मासे नाॅर्थ आर्यलंडच्या समुद्रात निघून जात आहे. नाॅर्थ आर्यलंडमधील समुद्राचं पाणी आर्यलंडच्या समुद्रातील पाण्यापेक्षा थंड आहे. माशांना हे असंच पाणी हवं असल्याने आर्यलंडमधून मासे नाॅर्थ आर्यलंडच्या समुद्रात जात आहे.

हवामान बदलामुळे नाॅर्थ अटलांटिक समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम आर्यलंडसारख्या समशीतोष्ण हवामान असलेल्या भागावर झाला आहे. आता आर्यलंडमधील तापमानही प्रमाणापेक्षा वाढू लागलं आहे. आर्यलंडमधील समुद्राच्या पाण्याचं तापमानही वाढलं. हे तापमान इतकं वाढलं की आर्यलंडमधल्या समुद्रातल्या माशांनी नाॅर्थ आर्यलंडच्या समुद्रात स्थलांतर करायला सुरुवात केली.

हवामान बदलामुळे नाॅर्थ अटलांटिक समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम आर्यलंडसारख्या समशीतोष्ण हवामान असलेल्या भागावर झाला आहे. आता आर्यलंडमधील तापमानही प्रमाणापेक्षा वाढू लागलं आहे. आर्यलंडमधील समुद्राच्या पाण्याचं तापमानही वाढलं. हे तापमान इतकं वाढलं की आर्यलंडमधल्या समुद्रातल्या माशांनी नाॅर्थ आर्यलंडच्या समुद्रात स्थलांतर करायला सुरुवात केली.

२०२३ च्या जुलै महिन्यात नाॅर्थ अटलांटिक समुद्राच्या पाण्याचं तापमान २४ अंश सेल्सिअस इतकं झालं. एवढं तापमान यापूर्वी कधीही नोंदवलं गेलं नव्हतं. त्याचा परिणाम आर्यलंडच्या समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढण्यावरही झाला.  एवढ्या गरम पाण्याची सवय नसल्यानेच मासे थंड पाण्याच्या शोधात आर्यलंडचा समुद्र सोडून दुसरीकडे जावू लागले.

 Image:- euronews

हेही वाचा!

आर्यलंडच्या समुद्रात निळा पांढरा मासा आणि मॅकरेल ज्याला आपल्याकडे बांगडा म्हणतात ते मासे मोठ्या प्रमाणावर होतात. आंतरराष्ट्रीय बाजारात या माशांना भावही खूप मिळतो. पण पाण्याच्या वाढलेल्या तापमानामुळे या माशांना आता  आर्यलंडच्या समुद्रात् राहणे नकोसं झालंय.

इंटरनॅशनल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज' या संस्थेने  हवामान बदलाहा परिणाम म्हणून गेल्या दहा वर्षांपासून समुद्रात उष्णतेच्या लाटा येत असल्याचं सांगितलं. आर्यलंडच्या समुद्राच्या पाण्याचं तापमान फारच वाढल्याने ते सोसवलं गेलं नाही आणि येथील माशांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. त्यामुळेच आज आर्यलंडच्या दराह सारखे इतर मासेमारी करणारी माणसंही उद्या आपल्याला मासेच मिळाले नाही तर विकणार काय? कमावणार काय? खाणार काय? या प्रश्नांनी चिंतीत आहेत.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact