पाऊस पडत नाही, ऊन प्रचंड तापतंय. पण माणसांना टेन्शनच नाही!

Image: .pbs.org

परीक्षा जवळ आल्या तर सिरियसली अभ्यास करायचा असतो. हा नियमच असतो ना.. पण जर परीक्षा तोंडावर असूनही आपण सिनेमा पाहात असू, मित्र-मैत्रिणींसोबत जास्त खेळत असू तर लगेच आपले आई बाबा म्हणतात , ' काय हे परीक्षेचं काही गांभीर्य आहे की नाही?' म्हणजे काय तर परीक्षा जवळ आल्या की परीक्षा असल्यासारखं वागायला हवं. पण असं प्रत्येक बाबातीत होत नाही ना, हाच तर प्रश्न आहे. आता हवामान बदलाचंच उदाहरण घ्या , हवामान बदल याबद्दल सतत बोललं जात आहे, वर्तमानपत्रात बातम्या आणि लेख छापून येत आहे. हवामान बदलाचे परिणाम जगात काही काही भागात दिसू लागले आहेत. ऋतुंचं चक्र बदललं आहे, रोजच्या तापमानातही मोठे बदल जाणवत आहेत. असं असतानाही आजूबाजूला पाहिलं तर हवामान बदलाबाबत काळजीने बोलणारी, त्यासाठी स्वत:हून काही कृती करणारी माणसं मात्र कमी आहेत. आज कोट्यावधी लोकांना हवामान बदलाच्या परिणामांचा फटका बसला आहे,पण तरीही हवामान बदलाविरुध्द पुढे येणाऱ्यांची संख्या मात्र कमी असं का?

हेही वाचा!

लोकांना हवामान बदलाचं गांभीर्य का नाही वाटत?

हवामान बदलाच्या प्रक्रियेचं, त्याच्या परिणामांचं लोकांना गांभिर्य का नाही वाटत, लोकं पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात पुढे का नाही येत याचा संशोधकांनी अभ्यास केला असता काही विशिष्ट कारणं समोर आली आहेत.

आज हवामान बदलाचे परिणाम जगात सर्वत्रच दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र काही भागात त्याचे तीव्र परिणाम दिसत आहेत. तर काही भागात थोडे . त्यामुळे ज्या भागात हवामान बदलांच्या परिणामांची तीव्रता कमी आहे तेथील लोक 'छे छ.. हवामान बदल असं काही नसतंच असं म्हणतात. तर अनेकजण पूथ्वीचं तापमान वाढतंय हे मानायलाच तयार नाही. हे तापमान वाढणं हे हवामान बदल नसून हे निसर्गाच्या नियमित चक्रातला एक भाग आहे. त्याचा इतका बाऊ करण्याचं कारण नाही असं म्हणत हवामान बदलाच्या परिणामांकडे दुर्लक्ष करत आहेत.

लोकांना हवामन बदलाचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे मोठ्या हानीला लोकं सामोरे जात आहेत. आणि हे सर्व नुकसान हवामान बदलाचा परिणाम आहे, हेही लोकांना समजत आहे. पण जितक्या प्रमाणात हे जाणवत आहे, तितक्या प्रमाणात मात्र लोकं त्याबाबतची कृती मात्र करत नाही.  कारण लोकांना हवामान बदल ही बाब खूप मोठी आहे, भयंकर आहे असं वाटतं. लोकं हवामान बदलांच्या परिणामांच्या तीव्रतेने घाबरुन गेलेली आहेत. पण काय करावं हे मात्र त्यांना सूचत नसल्याने ती काहीच करत नाहीये!

हवामान बदल ही सुरु राहाणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया खरंतर खूप वर्षांपासून स्रुरु आहे. पण याबाबतच्या जागृतीचं काम मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरु झालं आहे. हवामान बदल , त्याचे परिणाम हा मोठा विषय आहे. कोण्या एकाच्या कृतीत पर्यावरणपूरक बदल झालेत, चांगल्या सवयी त्यांनी रुजवल्या म्हणून लगेच हवामान बदलावर परिणाम होईल असं नाही. पण आपण सर्वांनी आप आपल्या पातळीवर कृती केली, आपल्या कृतीत सातत्य ठेवलं तर हवामान बदलाची प्रक्रिया कमी करणं शक्य आहे असा विश्वास मात्र लोकांमध्ये नक्की निर्माण होवू शकतो. आणि त्यातून लोकांना मोठ्या प्रमाणात हवामान बदलाच्या परिणामांना थोपवण्यासाठी, या प्रक्रियेचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे आपण प्रत्येकाने पर्यावरणाला अनुकूल आपल्या सवयी ठेवाव्यात असं अभ्यासक सांगतात.

Image: usatoday

हेही वाचा!

जगातल्या माणसांना मग काळजी कसली आहे?

आपल्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या हवामान बदलाबाबत लोकं गंभीर नाही, त्यांना त्याची काळजी वाटत नाही.त्यासाठी ते काही कृती करत नाही. मग जगभरातल्या लोकांना काळजी कसली आहे? असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न सतत होत असतो. ' फर्स्ट रिपोर्ट ऑफ द २०२१ वर्ल्ड रिस्क पोल ' नावाचं सर्वेक्षण घेण्यात आलं. त्यात १२१ देशातील १, २५,९११ लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या लोकांशी बोलून जगभरातल्या लोकांना कोणत्या समस्या जाणवत आहे हे शोधलं असता लोकांना हवामान बदल ही समस्या वाटत नसून त्यांना त्यापेक्षा इतर समस्या महत्वाच्या वाटत आहेत.

उत्तर अमेरिकेतील लोकांना रस्त्यावरील अपघात, गुन्हे, हिंसाचार यांची चिंता वाटते.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड देशातील लोकांना रस्त्यावरील अपघात, स्वयंपाक करताना होणारे अपघात्, घरात असताना होणारे अपघात..अशी अपघातांची काळजी वाटते.

लॅटीन अमेरिकेत गुन्हे, हिंसा तर आफ्रिकेत लोकांकडे पैसा नसणं, उत्तर आफ्रिकेतील लोकांना साथीचे रोग याची जास्त चिंता वाटते.

कोरोनाकाळात आणि कोरोनानंतर जगभरातल्या लोकांना कोरोनाचंच जास्त टेन्शन आलं होतं. हे टेन्शन अजूनही टिकून आहे.

हवामान बदल, त्या बदलांचे परिणाम याबाबत जगभरातल्या लोकांना चिंता वाटणं तर दूरच त्यांना त्याचं गांभीर्यच वाटत नसल्याचं दिसून येत आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact