तुवालू हा देश ऑस्ट्रेलिया खंडाच्या जवळ, प्रशांत महासागरात आहे. हा देश म्हणजे एक चिमुकलं बेट आहे. याचाच अर्थ असा, की या देशाच्या चारही बाजूंना अथांग समुद्र पसरलेला आहे. तुवालू हा देश आणि हवामानबदल यांचा फार जवळचा संबंध आहे.
हे वाचा!
हिऱ्यांचा आणि आपल्या भारताचा फार जवळचा संबंध आहे. कुठला माहितीये?
तुवालू देशाबद्दल काही महत्वाची माहिती
- तुवालू देशाचं क्षेत्रफळ २६ चौरस किलोमीटर्स आहे.
- या देशाची लोकसंख्या २०२१ सालच्या जनगणनेप्रमाणे ११,९०० इतकी आहे.
- हा देश १ ऑक्टोबर १९७८ युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळवून अस्तित्वात आला.
- कोसिया नातानो हे त्यांचे पंतप्रधान आहेत.
- इथे मुख्यतः पावसाचं पाणी साठवून वापरलं जातं. कारण या देशात इतर पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाहीत.
हे वाचा!
दूर बसलेल्या कुत्र्यालाही बिस्किटांचा डबा उघडल्याचं त्याला कसं कळतं?
तुवालू आणि हवामानबदल

- तुवालू या देशाचा बहुतांश भाग समुद्रसपाटीखाली ३ मीटर्स आहे.
- येथील जमिनीची सर्वाधिक उंची ही समुद्रसपाटीच्या वर ४.५ मीटर्स इतकीच आहे.
- तुवालूची भौगोलिक परिस्थिती अशी चमत्कारिक असल्यामुळे या देशाला हवामानबदलाचा सर्वाधिक धोका आहे.
- हवामानबदलाचा आजचा वेग लक्षात घेता येत्या १०० वर्षात समुद्राची पातळी २० ते ४० सेंटिमीटर्सनी वाढेल असा अंदाज आहे. तसं झालं तर तुवालू हा देश १०० वर्षात पूर्णपणे पाण्याखाली जाईल.
- मात्र येत्या ३० ते ४० वर्षांत हा देश राहण्यायोग्य उरणार नाही असा अंदाज वर्तवला जातो.
- या देशात पूर्वीपासूनच चक्रीवादळं आणि किंग टाईड्स (नेहेमीच्या लाटांपेक्षा मोठ्या लाटा) येतात. यामुळे तुवालूमध्ये अतोनात नुकसान होतं. गेल्या काही दशकांपासून या घटना जास्त वेळा घडू लागल्या आहेत.


