जगातल्या कोणत्याही राजा-राणीच्या मुकुटावरचा हिरा भारतातलाच होता!

2024जगातले सगळ्यात महाग दागिने कशाचे असतात माहितीये? चांदीचे? सोन्याचे? प्लॅटिनमचे? अं हं! हिऱ्याचे! हिऱ्याच्या दागिन्यांइतके महाग दागिने दुसरे कुठलेही नसतात. अर्थात सगळे हिरे काही भयंकर महाग नसतात. हिऱ्यांचा आकार, दर्जा, रंग यासारख्या अनेक गोष्टींवरून त्यांची किंमत ठरते. पण तरीही, अगदी साध्यात साधा अगदी कमीत कमी किंमतीचा हिरासुद्धा खूप महाग असतो. बहुतेक वेळा त्याची किंमतसुद्धा सोन्याहून जास्त असते. आणि कदाचित म्हणूनच, पण जगाच्या इतिहासात हिऱ्यांसाठी अनेक युद्ध झाली आहेत, अनेक खून झाले आहेत. पण हिऱ्यांची एक चांगली बाजू पण असते. हिऱ्यांचा वापर औषधांमध्येही केला जातो. अशा हिऱ्यांचा आणि आपल्या भारताचा फार जवळचा संबंध आहे. कुठला माहितीये?

हे वाचा!

पाण्यात राहून माशांना कधीच सर्दी होत नाही का? शिंका येत नाही का?

१८९६ सालापर्यंत संपूर्ण जगात फक्त भारतात हिऱ्यांच्या खाणी होत्या. म्हणजेच जगाच्या पाठीवर कुठेही असलेला हिरा हा फक्त आणि फक्त भारतात सापडलेला असायचा. म्हणजेच, १८९६ सालापर्यंत जगाच्या इतिहासातल्या प्रत्येक राजाच्या आणि राणीच्या मुकुटावर जडवलेला प्रत्येक हिरा भारतीय होता. १८९६ साली आफ्रिकेत पहिली हिऱ्यांची खाण सापडली. अर्थात हिऱ्यांची खाण जरी १८९६ साली सुरु झाली असली, तरी आफ्रिकेच्या विविध भागात १८६५ सालापासून लोकांना कुठे कुठे हिरे सापडत होते.

आधी भारत, मग आफ्रिका खंड इथून सुरुवात होऊन आज जगातील या सर्व देशात हिऱ्यांच्या खाणी आहेत.

 

पण इतर अनेक देशांमध्ये जरी आज हिरे सापडत असले, तरीही भारत हा अजूनही हिऱ्यांच्या निर्यातीतील एक महत्वाचा देश आहे. भारतात सापडणाऱ्या एकूण हिऱ्यांपैकी ९० टक्के हिरे हे मध्य प्रदेशात सापडतात. भारतातून दरवर्षी निर्यात केल्या जाणाऱ्या हिऱ्यांमुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोलाची मदत होते. 

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact