दहावी झाल्यावर पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नसेल तर?

दहावीनंतर काय हे अजून पक्कं झालं नाही म्हणून पुढे काही करताच येणार नाही असं नाही! हे ठरवणं अवघड तर मुळीच नाही!

चांगले मार्क्स हवे आहेत पण त्यासाठी कष्ट करण्याची माझी तयारी नसेल तर?

काम कोणतंही असो ते पूर्ण करायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. अभ्यासाचा कंटाळाच केला तर परीक्षेत चांगले गुण मिळवणं अशक्य आहे.