ईईईईईईईई! आपण किडे मारले तर बिघडलं काय?- भाग ४

“किड्यांचं काम???” ईशान हसायलाच लागला. “किडे कुठे काय काम करतात? नुसते इकडे उडतात आणि बसतात. त्यांना काय बाबासारखी शाळा असते का आईसारखं ऑफिस असतं?”