इलेक्ट्राॅनिक मातीत उगवले जव.. पण माती कुठे इलेक्ट्राॅनिक असते का?

Image: humintech

आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक कामांसाठी आता इलेक्ट्राॅनिक वस्तूंचे पर्याय उपलब्ध आहेत. बेरीज वजाबाकी करणाऱ्या कॅलक्युलेटरपासून घर स्वच्छ करणाऱ्या उपकरणांपर्यंत आपण अनेक वस्तू इलेक्ट्राॅनिक्सच्या वापरतो. इलेक्ट्राॅनिक वस्तुंमुळे अवघड काम सोपं होतं आणि कमी वेळात होतं. त्यामुळे वेळ घालून खूप कष्ट करुन काम करण्यापेक्षा त्याला काही इलेक्ट्राॅनिक पर्याय उपलब्ध आहेत का? हे आधी शोधलं जातं. हे जरी खरं असलं तरी अन्न पिकवण्यासाठी शेतीच करावी लागते. तिथे भलेही कामं सोपं करणारी अनेक उपकरणं आली असली तरी माणसाला मातीत कष्ट करुनच शेती पिकवावी लागते. पण तुम्हाला माहितीये का आता शेती पिकवण्यासाठी इलेक्ट्राॅनिक मातीचा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी देखील झाला. शेतीसाठी इलेक्ट्राॅनिक माती असं ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. उत्तर युरोपातील स्वीडन येथील 'लिंकोपिंग युनिव्हर्सिटी'तील संशोधकांनी हा इलेक्ट्राॅनिक मातीचा प्रयोग करुन जव पिकवले आहे. आणि पारंपरिक पध्दतीने पिकणाऱ्या जवापेक्षा इलेक्ट्राॅनिक मातीचा उपयोग करुन पिकवलेल्या जवाची वाढ ५० टक्के अधिक आहे.

हेही वाचा!

इलेक्ट्राॅनिक माती हा प्रकार काय?

हायड्रोपोनिक लागवड या प्रकारच्या शेतीमध्ये या इलेक्ट्राॅनिक मातीचा उपयोग होतो. संशोधकांच्या गटाने इलेक्ट्रिक पध्दतीनं वहन करणाऱ्या घटकांचा वापर करुन हायड्रोपोनिक लागवडीच्या पध्दतीनं जव पिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयोग केला आहे.

हायड्रोपिनिक लागवड म्हणजे वनस्पती मातीशिवाय वाढतात. त्यांना वाढीसाठी थोडं पाणी, पोषक घटक आणि या वनस्पतींच्या मुळांना जोडणारा घटक एवढयाच गोष्टीची आवश्यकता असते. या पध्दतीची लागवड ही खुली नसून बंद प्रणालीमध्ये केली जाते. त्याचा फायदा म्हणजे पाण्याचं पुनराभिसरण होतं. त्यामुळे प्रत्येक रोपाला आवश्यक पोषक घटक पोहोचतात. तसेच पाण्याचं पुनराभिसरण होत असल्याने पाणी देखील कमी लागतं. आणि जे पोषक घटक रोपाने वापरले नाही ते घटक नष्ट न होता ते व्यवस्थेमध्ये तसेच राहतात आणि जेव्हा रोपाला त्या पोषक घटकांची गरज असते तेव्हा ते वापरले जातात. पारंपरिक पध्दतीने म्हणजे मातीचा वापर करुन होणाऱ्या शेतीत अशा प्रकारे पोषक घटक टिकून राहात नाही.

Image: phys

हायड्रोपोनिक्स लागवडीमध्ये कमी जागेत लागवड करता येते. त्यासाठी उभ्या पध्दतीने लागवड केली जाते. संशोधक म्हणतात या पध्दतीचा वापर करुन लेट्यूस, औषधी वनस्पती आणि भाजीपाला पिकवला जावू शकतो.  त्यासाठी शास्त्रज्ञांनी हायड्रोपोनिक्स पध्दतीनेजव पिकवले आणि या या जवांच्या मुळांना विद्युत उत्तेजन देवून त्यांची वाढ चांगली होते हे दाखवून दिले आहे. अशा प्रकारे रोपं लावून कमी साधनांमध्ये त्यांची चांगली वाढ दुप्पट गतीने करता येते असं संशोधक म्हणतात.

हेही वाचा!

Image: ts2.space

हायड्रोपोनिक्स लागवडीमध्ये कमी जागेत लागवड करता येते. त्यासाठी उभ्या पध्दतीने लागवड केली जाते. संशोधक म्हणतात या पध्दतीचा वापर करुन लेट्यूस, औषधी वनस्पती आणि भाजीपाला पिकवला जावू शकतो.  त्यासाठी शास्त्रज्ञांनी हायड्रोपोनिक्स पध्दतीनेजव पिकवले आणि या या जवांच्या मुळांना विद्यूत उत्तेजन देवून त्यांची वाढ चांगली होते हे दाखवून दिले आहे. अशा प्रकारे रोपं लावून कमी साधनांमध्ये त्यांची चांगली वाढ दुप्पट गतीने करता येते असं संशोधक म्हणतात.

हायड्रोपोनिक लागवडीमध्ये खनिज लोकर ज्याला मिनरल वूल म्हटलं जातं त्याचा वापर केला जातो. या खनिज लोकरीचं जैविक पध्दतीने विघटन होत नाही. आणि ती ऊर्जा केंद्रित प्रक्रियेद्वारे निर्माण करता येते. इलेक्ट्राॅनिक लागवडीसाठीची इ साॅइल म्हणजे इ माती अर्थातच इलेक्ट्राॅनिक माती ही सेल्यूलोजने तयार झालेली असते. त्यात विद्यूत वहन करणारे पाॅलिमर ज्यांना 'पीईडीओटी' असं म्हणतात ते मिसळलेले असतात. अशा प्रकारचं मिश्रण नवीन नाही पण रोपं वाढवण्यासाठी, वनस्पती वाढवण्यासाठी त्याचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारे इलेक्ट्राॅनिक मातीचा वापर करुन रोपं वाढवण्याचा प्रयोग करुन हायड्रोपोनिक लागवडीवर आणखी नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा संशोधकांना मिळाली आहे.

हायड्रोपोनिक पध्दतीने वनस्पतींची लागवड केल्याने, त्यांची वाढ केल्याने सतत लोकसंख्या वाढत असलेल्या जगाचा अन्नाचा प्रश्न सुटेल असा काही संशोधकांचा दावा नाही. पण प्रतिकूल हवामान आणि थोडीशीच जागा उपलब्ध असेल तेव्हा अशा हायड्रोपोनिक पध्दतीच्या लागवडीचा नक्कीच खूप फायदा होईल असं संशोधक म्हणतात. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact