हत्तीला कुठे गाता येतं का? पण हत्ती गुणगुणतात! ते कसे?

Image: youngisthan.in

जंगलात हत्ती जेव्हा गर्जना करतो तेव्हा भले भले धाडसी माणसं घाबरुन जातात. हत्तीची गर्जना चांगली गडगडाटी आवाजातली असते. पण हत्ती केवळ गर्जनाच करत नाही तर माणसारखं गुणगुणण्याची क्षमताही हत्तींमध्ये असते. पण हत्तीचं गुणगुणनं मात्र माणसाला ऐकू जात नाही. म्हणूनच हत्ती खरंच गुणगुणतो यावर विश्वासच बसत नाही. हत्तीच्या गुणगुणण्याचा आवाज हा इतक्या कमी वारंवारितेचा (फ्रिक्वेन्सी) असतो की माणसाला तो ऐकू जात नाही. हत्तींमध्ये असलेल्या या गुणगुणण्याच्या क्षमतेवर संशोधकांनी अभ्यास केला आणि त्यानंतर ते अशा काही निष्कर्षावर पोहोचले की त्यातून हत्तींना गुणगुणता येतं यावर शिक्कामोर्तब तर झालंच शिवाय हत्ती जे गुणगुणतात ते इतक्या कमी वारंवारितेचं असतं की आपल्याला ऐकू येत नाही. हत्तींचं गुणगुणनं हे टाइमपास नसतो तर विशिष्ट संदेश देण्यासाठी हत्ती गुणगुणतात.

हेही वाचा!

हत्तीच्या गाण्याबद्दल संधोधक काय म्हणतात?

मानवाला २० किलो हर्टझ वारंवारितेचा ध्वनी व्यवस्थित ऐकू येतो. त्यापेक्षा जास्त वारंवारिता आणि त्यापेक्षा कमी वारंवारिता असणारे ध्वनी मानवाला ऐकू जात नाही. हत्ती गुणगुणतात ते गुणगुणनं म्हणजे अल्ट्रासाउंडमधील त्यांची गर्जनाच असते. अल्ट्रासाउंड म्हणजे मानवाच्या श्रवणक्षमतेच्या पलिकडचे आवाज.

आपला कळप एकत्र ठेवण्यासाठी आणि मादी जोडीदार शोधण्यासाठी नर हत्ती गुणगुणतात असं संशोधनात आढळून आलं आहे.

या गुणगुणण्याद्वारे हत्ती पार ६ मैलांवर असलेल्या आपल्या इतर साथीदारांसोबत संवाद साधतात. कमी आवाजातलं हे हत्तींचं गुणगुणनं हे २० किलो हर्टझपेक्षाही कमी वारंवारितेचं असतं. माणसं ज्याप्रमाणे गातात ते तंत्र हत्तीच्या गुणगुणण्यातही वापरलं जातं.

स्वरयंत्रातील स्नायुंना हिसका देवून मांजर गुरगुरण्याचा अश्राव्य ध्वनी ( म्हणजे जो आवाज सहज ऐकू येत नाही) काढतात. हत्तीही गुणगुणताना याच तंत्राचा अभ्यास करतात का? हे शोधण्याची संशोधकांना उत्सुकता होती.

हत्ती हे मुक्तपणे कमी वारंवारितेचे ध्वनी निर्माण करतात हे संशोधकांना आढळून आलं आहे. पण हे ध्वनी हवेवर स्वार होवून इतरत्र पसरतात. माणूस जेव्हा गातो तेव्हा हेच तंत्र तो वापरतो.पण हत्तीच्या स्वरयंत्रातून निघालेले आणि वाऱ्यावर पसरणारे ध्वनी हे माणसाला ऐकू जाणार नाही इतक्या कमी वारंवारितेचे असतात.

Image: facebook

हेही वाचा!

Image: .elephantnaturepark.org

जर्मन शास्त्रज्ञांच्या समुहाने बर्लिन येथील आफ्रिकन हत्ती जो नैसर्गिकरित्या मरण पावला त्याच्या गळ्यातील स्वरयंत्र काढून त्याचा अभ्यास करुन आपले निष्कर्ष काढलेत. हा अभ्यास करताना स्वरयंत्रातून दाबयुक्त हवा जेव्हा जाते त्याद्वारे हत्ती काढत असलेला आवाज पुर्नउत्पादित होतो का? हे पाहिलं गेलं. याबाबतचे पाहणी निष्कर्ष सायन्स पत्रिकेत प्रसिध्द झाले. या निष्कर्षांनुसार मानवाच्या बाबतीत स्वरयंत्रातील स्नायुंना हिसका देवून ध्वनी निर्मिती होत नाही. अभ्यास दाखवतो की हत्ती जेव्हा मोठ्याने गर्जना करतात तेव्हा स्वरयंत्रातील स्नायुंना हिसका देवून ध्वनी निर्मिती होते पण वारंवारिता कमी असलेल्या हत्तीच्या गुणगुणण्याला त्या हिसक्याची गरज नाही. कमी वारंवारितेचे आवाज हे सतत कंपन पावणाऱ्या उतींच्या परिणामांशी आणि दाबांशी संबंधित असतात.

संशोधक सांगतात की हत्तीचे स्वरयंत्र हे अशी कंपनप्रणाली तयार करते जी मानव आणी इतर सस्तन प्राण्यांच्या बाबतीत समान आढळते. या कंपनातून हत्ती स्वरयंत्राच्या खालील जोडीचा वापर करुन दूरवर असलेल्या आपल्या साथीदार प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी कमी तीव्रतेच्या वारंवारितेचे आवाज निर्माण करतात. त्यामुळे हत्ती गुणगुणतात पण आपल्याला ते ऐकू येत नाही हेच खरं. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact