झाडाच्या पानावर आपल्या अळी दिसली की आपण लगेच ईईईई. अळी... करुन ओरडतो. लांब होतो. पण तेच बागेत उडणारं फुलपाखरु दिसलं की त्याला पकडायला धावतो. अळीचा आपल्याला तिटकारा येतो, पण फुलपाखरु मात्र हवंहवंसं वाटतं. त्याला पकडून आपल्या जवळ ठेवावंसं वाटतं. खरंतर ज्या अळीची आपल्याला कीळस येते त्यातूनच फुलपाखराचा जन्म होतो. अळीचं ज्याप्रकारे फुलपाखरु होतं, त्या प्रक्रियेमुळे फुलपाखराचा पुर्नजन्म होतो असं म्हटलं जातं. फुलपाखरु म्हणजे 'टू इन वन' असं म्हटलं जातं.
सुरुवातीला एक अळी असते. ती झाडावरची पानं खाऊन खाऊन गल्लेलठ्ठ होते. तिचं सुरवंट होतं आणि या सुरवंटीतूनच फुलपाखरु जन्माला येतं. पानावर वळवळ करत चालणाऱ्या अळीचं उडणारं फुलपाखरु होतं. फुलपाखरु बनताना अळीचं पूर्ण स्वरुपच बदलतं, म्हणून फुलपाखराचा पुर्नजन्म होतो असं म्हणतात. अळीचं प्रौढ रुप म्हणजे फुलपाखरु. अळीपेक्षा फुलपाखरु हा पूर्णत: नवीन जीव असतो. अळी जन्मते. पूर्ण जगते. मग ती विरघळते आणि त्यातून फुलपाखराचा जन्म होतो

Image: timesofindia.

Image: upsidedance
फुलपाखरांचं जीवनचक्र असतं कसं ?
पानं खाऊन खाऊन गलेलठ्ठ झालेली अळी स्वत:भोवती एक रेशीम कोश विणते. त्या कोशात जावून अळी शांत होते. कोशात गेलेल्या अळीचा आकार छोटा होतो. अळीची त्वचा निघून जाते. तिचे सर्व अवयव विरघळतात. पूर्ण पाण्यासारखा द्राव तयार होतो. त्या द्रावातील बहुतांश पेशी मरतात. पण काही लपलेल्या पेशी असतात. त्या एका क्षणी क्रियाशील होतात. त्या पेशी प्रथिनांची आणि इतर पोषक घटकांची पुर्नरचना करतात आणि अळीपेक्षा एकदम वेगळं दिसणारं , वागणारं फुलपाखरु जन्माला येतं. जेव्हा अळी किंवा सुरवंट असते तेव्हा तिला फक्त पाय आणि डोके एवढेच अवयव असतात. पण कोशातून बाहेर पडलेल्या फुलपाखराला डोळे, पाय, पंख, सोंड आणि मिशा हे अवयव असतात. हे फुलपाखरु मस्त उडायला लागतं.
अळी जन्मते. पानं खाऊन जाडजूड होते. मग ती कोशात जाते. कोशात गेली म्हणजे अळी संपण्याची क्रिया घडत असते. बाहेरुन वाटतं की काहीच घडत नाही. पण कोशात खूप काही घडत असतं. अळीतून फुलपाखराचा जन्म होत असला तरी दोघांचं गुणसूत्र एकत्र होत नाही. तर अळी आणि फुलपाखरु डीएनए रेणू वाटून घेतात. जसं प्रवासाला जाताना दोन ड्रायव्हर एक गाडी चालवतात. गाडी एकच असते. पण एका ड्रायव्हरची वेळ संपली की ती गाडी नवीन ड्रायव्हर चालवायला घेतो. अळी आणि फुलपाखराच्या बाबतीत हे असंच होतं. फुलपाखराचा पुर्नजन्म होतो तो असा.

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact