इलेक्ट्रिक ईल माशापासून लांबच राहा! तो देतो ६०० व्हाॅल्टचा इलेक्ट्रिक शाॅक!

Image: theconversation

ईल म्हणजे सापासारखा दिसणारा एक लांब मासा. हा जलचर प्राणी इलेक्ट्रोफोरस इलेक्ट्रिकस नावाने ओळखला जातो. हा समुद्री साप नसून एक प्रकारचा मासाच आहे. त्यांना इलेक्ट्रिक ईल म्हणून ओळखलं जातं. हे मासे दक्षिण अमेरिकेतील नद्यांमध्ये गोड्या पाण्यामध्ये आढळतात. या माशाचं वैशिष्ट्यं म्हणजे हा मासा शरीरात विद्युत निर्मिती करतात आणि ती शरीराबाहेर टाकून इलेक्ट्रिक शाॅक देतात. या शाॅक देण्याच्या वैशिष्ट्यांचा ते वेगवेगळ्या उद्देशाने वापर करतात.  इलेक्ट्रिक ईल हा मासा खास विद्युत निर्मिती आणि शाॅक देण्यासाठी ओळखला जात असला तरी इतर अनेक वैशिष्ट्यंही या माशांकडे आहेत जे त्यांना  इतर माशांपेक्षा वेगळं ठरवतात.

हेही वाचा!

कसे असतात हे शाॅक देणारे मासे?

इलेक्ट्रिक ईल हे सापासारखे लांब असले तरी ते साप नसतात. तर लांब आकाराचे मासे असतात. ज्यांना 'नाइफफिश' म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या शरीरात विद्युत निर्मिती करुन इतरांना शाॅक देणारा हा मासा मासा आणि प्राणी म्हणूनही वेगळा ठरतो.

शरीरात विद्युतनिर्मिती करुन ६०० व्हाॅल्टपर्यंतचा शाॅक हे इलेक्ट्रिक ईल देतात. त्यामुळेच निसर्गातला ताकदवान प्राणी म्हणूनही इलेक्ट्रिक ईल ओळखले जातात.

स्वत:च्या सुरक्षेसाठी हे इलेक्ट्रिक इल विद्युत झटका म्हणजे इलेक्ट्रिक शाॅक देतात. ते जेव्हा समोरच्या शत्रूमुळे घाबरतात तेव्हा शरीरात विद्युतनिर्मिती करुन इलेक्ट्रिक शाॅक देतात आणि समोरच्या ताकदवान शत्रूला शाॅक देवून निश्चल करुन टाकतात.

Image: wonderopolis

आपलं भक्ष्य शोधण्यासाठी इलेक्ट्रिक ईल्स इलेक्ट्रिक शाॅकचा वापर करतात. त्यासाठी ते जिथे असतात तिथून कमी दाबाचा विद्युत प्रभाव शरीरात निर्माण करुन ते पाण्यात सोडतात. त्याद्वारे इतर प्राण्यांनी निर्माण केलेल्या विद्युत संकेतांचा ( इलेक्ट्रिक सिग्नल्स) शोध घेतात. या वैशिष्ट्यांमुळे त्यांना गढूळ पाण्यातही आपलं भक्ष्य सहज शोधता येतं.

इलेक्ट्रिक ईल शरीरातून शाॅक निर्माण करतात ते त्यांच्या शरीरात असलेल्या विद्युत अपघटनी म्हणजे इलेक्ट्रोसाइटसद्वारे. हे विद्युत अपघटनी त्यांच्या शरीरात बहुतांश भागात असतात. हे विद्युत अपघटन छोट्या बॅटरीजप्रमाणे काम करतात आणि शरीराच्या मागणीनुसार विद्युत शाॅक निर्माण करतात.

आपल्या शरीरातून मिलीसेंकद इतकाच वेळ इलेक्ट्रिक शाॅक बाहेर टाकणारे इलेक्ट्रिक ईल हे पुढेचे दोन तास विशिष्ट अंतराने इलेक्ट्रिक शाॅक आपल्या शरीराच्या बाहेर टाकतात.

माणसांसाठी इलेक्ट्रिक इल देतात ते शाॅक प्राणघातक नसले तरी त्यामुळे गंभीर इजा मात्र नक्कीच होवू शकते. शरीरात बधिरता येते आणि शाॅक बसलेला भाग काही अर्धांगवायू झाल्यासारखा लुळा पडतो.

Image: nytimes

इलेक्ट्रिक इल हे एकटे राहणारे मासे असतात आणि ते जिथे राहतात तिथे ते प्रादेशिक वर्चस्व निर्माण करतात. ते स्वत:चं शिकार करण्याचं क्षेत्र तयार करतात आणि त्याजागी इतर घुसखोर माशे आणि प्राणी यांना येवू देत नाही.

हे प्रभावी जलचर असले तरी इलेक्ट्रिक ईल्समध्ये श्वास घेण्याची क्षमता असते. ते पाण्याच्या पृष्ठभागावर येवून ऑक्सिजन घेतात. त्यासाठी त्यांच्या शरीरात 'स्विम ब्लॅडर' नावाचा विशिष्ट अवयव असतो.

इलेक्ट्रिक ईल्स खूप लांब वाढतात. आठ फुटापर्यंत त्यांची लांबी वाढते. पण या माशांचं शरीर इतकं लवचिक असतं की आपलं लांब शरीर गुंडाळून पाण्यातील वनस्पतीतून सहज मार्ग काढतात.

शरीरावर गडद रंग धारण करुन शत्रूपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वत:ला लपवून ठेवण्याचं कौशल्य या माशांमध्ये असतं.

हेही वाचा!

प्रजननाच्या काळात मादी माशांना आकर्षित करण्यासाठी शरीरात कमी भाराचे विद्युत संकेत निर्माण करतात. याबाबतीत प्रत्येक इलेक्ट्रिक ईल्सची पध्दत वेगळी असते.

या माशांना फार कमी दिसतं. पण आपलं भक्ष्य अचूक हेरण्याची क्षमता इलेक्ट्रिक ईल्समध्ये असते. या इलेक्ट्रिक ईल्समध्ये विद्युत ग्राहक क्षमता असते त्याच्या बळावरच ते आपलं भक्ष्य शोधू शकतात. ते शरीरातून विद्युत निर्मिती करुन इतर प्राण्यांकडून येणारे विद्युत संकेत ते ग्रहण करतात आणि आपल्या भक्ष्यापर्यंत सहज पोहोचतात.

पाण्याचं प्रदूषण, बेसुमार मासेमारी यामुळे इलेक्ट्रिक ईल्सचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत. त्यामुळे त्यांची संख्या कमी होते आहे. हे मासे जिवंत राहण्यासाठी शाश्वत पध्दतीन मासेमारी करण्याची आवश्यकता आहे. याद्वारे समुद्रातील हे जंगली मासे जिवंत राहू शकतील.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact