
Image: thebalisun
पडांगटेगल हे एका गावाचं नाव आहे. इंडोनेशियातील बाली प्रातांतील उबुड नगरातलं एक गाव. इंडोनेशियातल्या इतर गावं आणि शहरांपेक्षा हे गाव वेगळं आहे. एरवी पडांगटेगल हे कोण कुठलं गाव कोणाच्या लक्षातही आलं नसतं, पण आज या गावाने एकत्रित प्रयत्न करुन, काम करुन आपली एक ओळख निर्माण केली आहे. या गावाने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. काय आहे या गावाची वेगळी ओळख? - शून्य कचरा म्हणजेच झीरो वेस्ट ही या गावाची विशेष ओळख आहे. कचरा कसा कमी करु शकतो यासाठी साऱ्या जगाने पडांगटेगल या गावाचा आदर्श गिरवायला हवा असं म्हटलं जातं. बाली प्रांतातील इतर गावात आणि शहरात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. लोकं कचरा रस्त्यावर , दरी खोऱ्यात फेकतात. आणि हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाने मग हा सगळा कचरा समुद्रात वाहून येतो. इंडोनेशिया म्हणजे जास्त लोकसंख्या असलेला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश. हा देश प्रामुख्याने पर्यटनासाठी ओळखला जातो. पण डिसेंबरमध्ये मात्र इंडोनेशियातील समुद्रावर प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आलेला असतो.
इंडोनेशियातील सरकार कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देत नाही. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? हा प्रश्न येथील सरकारने येथे राहणाऱ्या नागरिकांवर सोडून दिला आहे. आणि नागरिकही स्वत: यासाठी काहीच करत नसल्याने इंडोनेशियातील समुद्र किनाऱ्यांच्या ओढीने जगभरातले पर्यटक येतात त्यांना डिसेंबरात पडणाऱ्या पावसामुळे समुद्र किनारे म्हणजे कचऱ्याचे ढीग वाटू लागतात.
पावसाच्या पाण्याने रस्त्यावर, दऱ्या खोऱ्यात लोकांनी टाकलेला कचरा समुद्र किनाऱ्यावर साचून किनारे कचऱ्याने अक्षरश: चोकप होतात. सरकार कचऱ्यावर काही करत नाही तर आपणच काहीतरी करायला हवं असं पडांगटेगल गावातील लोकांना वाटू लागलं आणि २०१५ मध्ये या गावाचं ' शून्य कचरा धोरण' ( झिरो वेस्ट पाॅलिसी) तयार झालं. हे धोरण तयार करण्यामागे या गावचे रहिवासी सुब्रता यांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा!
पडांगटेगल गावाची झीरो वेस्ट पाॅलिसी आहे तरी काय?

Image: freepik
हेही वाचा!

Image: authentic-indonesia
आज पडांगटेगल हे केवळ इडोनेशियासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी शून्य कचरा धोरण यशस्वी राबवण्याबाबत आदर्श गाव बनलं आहे. पडांगटेगल गावाचं पाहून आता बालीमधील काही मोठ्या गावांनी झीरो वेस्ट पाॅलिसी राबवायला सुरुवात केली आहे. टेगलटिरटो या गावाची लोकसंख्या ५,००० आहे . या गावाने २०१८ पासून झीरो वेस्ट पाॅलिसी राबवायला सुरुवात केली. कांग्गू हा बालीचा उपजिल्हा. येथील सेसेह हे गाव. १०,००० लोकसंख्येचं हे गाव. २०१९ पासून या गावाने झीरो वेस्ट पाॅलिसी राबवायला सुरुवात केली आहे. सावन हे ७००० लोकसंख्येचं गाव. या गावाने २०२० पासून झीरो वेस्ट पाॅलिसी राबवायला सुरुवात केली.
पडांगटेगल हे गाव आणि या गावापासून प्रेरणा घेवून कचरा कमी करण्यासाठी काम करणारे टेगलटिरटो, सेसेह आणि सावन ही गावं बघितली तर कचऱ्यावर काम करुन झीरो वेस्ट हे ध्येय गाठणं अवघड नाही हे लक्षात येतं. आज केवळ इंडोनेशियातील गावांनी आणि तेथील शहरांनीच प्रेरित होणं पुरेसं नाही. आपल्या पृथ्वीवरचा कचरा कमी करण्यासाठी पडांगटेगल गावाचा आदर्श खरंतर संपूर्ण जगाला घ्यावा लागेल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact