डाॅ. डीप सी यांनी खोल समुद्रात १०० दिवस मुक्काम ठोकला.

Image: gizmodo.uol

समुद्राच्या पाण्यात खोल गेल्यानंतर कसं वाटतं, तिथे आपल्याला काय काय दिसतं याचं खूप कुतुहल असतं माणसाला. स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अनेक जण काही तासांसाठी समुद्राच्या पृष्ठभागाखालचं जग अनुभवतात. हे जग पाहिल्यानंतर वाटतं की समुद्रात खोल आपलं घर असतं, तिथे आपल्याला राहाता आलं असतं तर किती मजा आली असती, असं वाटतं ना आपल्याला. पण समुद्रात खोलवर कुणी राहातं का असं म्हणून आपण समुद्राच्या खोल जगातून स्वत:ला बाहेर काढतो. समुद्रात खोल उतरुन तिथे राहाणं शक्य आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? तो बसायला हवा, कारण असं घडलं आहे. अमेरिकेतील एक विज्ञानाचे शिक्षक समुद्राच्या पृष्ठभागापासून ३० फूट खोल जागी एक दोन दिवस नाही तर तब्बल १००  दिवस राहून आले आहेत. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डस'मध्येही झाली आहे. 'डाॅ. डीप सी या नावाने ते आता जगभरात ओळखले जातात.

हेही वाचा!

कोण आहेत डाॅ. डीप सी?

डाॅ. डीप सी यांचं खरं नाव डाॅ. जोसेफ डिटूरी हे असून ते ५५  वर्षांचे आहेत.  अमेरिकेतील साउथ फ्लोरिडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडा येथे ते विज्ञानाचे शिक्षक आहेत.  ते समुद्रात खोलवर काही पहिल्यांदाच राहायला गेले होते असं नाही तर १००  दिवसांचा मुक्काम करण्याआधी ते यापूर्वी समुद्रात खोलवर ७३  दिवस राहून आले आहेत. त्यांनी समुद्रात खोलवर १००  दिवस मुक्काम करुन स्वत:चा आधीचा विक्रम मोडला आहे.

हेही वाचा!

डाॅ. डीप सी यांचा १०० दिवसांचा मुक्काम

१ मार्च २०२३ रोजी डाॅ. डीप सी फ्लोरिडा येथील कीज द्वीपसमूहातील की लार्गो येथील बेटाच्या पाण्यात उतरले. या बेटावर पाण्याखाली ३० फूट  खोल 'ज्यूल्स अंडरसी लाॅज आहे' या लाॅजमध्ये डाॅ. डीप सी राहाण्यास गेले. हे ज्यूल्स अंडरसी लाॅज खास पाण्याखाली काही काळ मुक्काम करण्यासाठी तयार केलेलं आहे.  स्कुबा डायव्हिंग करणारे काही काळ येथे राहातात. तर काही जण छोट्याशा ट्रीपसाठी येथे येतात. तर काही ऑफिसची झूम मीटिंग या पाण्याखालच्या लाॅजमध्ये करतात. हे लाॅज सर्व सुविधांनी युक्त असून येथे वायफायची देखील व्यवस्था आहे. १०० मीटर स्क्वे.फिट जागेत असलेल्या या लाॅजमध्ये झोपण्यासाठी जागा, बसण्यासाठी एक छोटासा हाॅल आणि खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी एक किचन आहे. अशा या लाॅजमध्ये डाॅ. डीप सी एकटे १०० दिवस राहिले.

डाॅ. डीप सी काही सहलीसाठी किंवा झूम मीटिंग करण्यासाठी म्हणून गेले नव्हते. तर ते एका अभ्यासासाठी गेले होते. त्यांना समुद्राच्या पृष्ठभागापासून खाली पाण्यात राहून याचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे अभ्यासायचे होते.

Image: .indiatvnews

डाॅ. डीप सी यांचा अनुभव काय सांगतो?

डाॅ. डीप सी यांना समुद्राच्या पृष्ठभागाखाली समुद्राच्या पृष्ठभागापेक्षा जास्त भार शरीरावर पडत असल्याचं जाणवलं. हा भार समुद्राच्य पृष्ठभगावर जाणावणाऱ्या दाबापेक्षा ६६ टक्के जास्त होता. या दाबाचा मानवाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो असं डाॅ. डीप सी स्वत:च्या अनुभवातून सांगतात.

समुद्राच्या पाण्याखाली जाणवणारा हा जास्तीचा दाब आरोग्यदायी दीघायुष्य लाभण्यासाठी फायदेशीर ठरेल. याचा उपयोग डाॅक्टरांना डोक्याला, मेंदूला इजा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी होईल.

१०० दिवस समुद्रात खोलवर पाण्यात राहिल्याने त्यांना येथील जागेत असलेल्या दाबाने त्यांची उंची १. ३ से.मी. ने कमी झालेली आढळली. तसेच त्यांना पूर्वीपेक्षा या काळात जास्त चांगली झोप आली. १०० दिवसांच्या या मुक्कामात त्यांना त्यांचं आरोग्य सुधारल्यासारखं वाटलं.

Image: .indiatvnews

डाॅ. डीप. सी दिवसभर काय करायचे?

डाॅ. डीप सी समुद्राच्या पाण्यात खोलवर ज्यूल्स अंडरसी लाॅज मध्ये राहात होते तेव्हा दिवसभर ते आपल्या कामात बिझी असायचे. त्या काळात  ते त्यांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घ्यायचे.

भरपूर व्यायाम करायचे. त्या लाॅजमधील खिडकीतून दिसणारं समुद्रातल विश्व न्याहाळायचे. या १००  दिवसात डाॅ. डीप सी यांनी १५  देशातील ५,५००  विद्यार्थ्यांशी ऑनलाइन चॅटद्वारे संवाद  साधला. .

या काळात त्यांना त्यांचे मित्र , त्यांना या मोहिमेसाठी मदत करणारे थोडा वेळ येवून भेटून जायचे. ९ जून  २०२३  रोजी डाॅ. डीप सी हे आपला समुद्राच्या खोल पाण्यातला मुक्काम संपवून समुद्राच्या पृष्ठभागावर आले. या १०० दिवसात आपण केवळ सूर्यप्रकाश मिस केल्याचं डाॅ. डीप सी सांगतात. ते त्यांच्या १०० दिवसांच्या अनुभवावर , त्या काळत केलेल्या निरिक्षणांवर, अभ्यासावर  आधारित एक प्रोजेक्ट लिहीत आहे. हा प्रकल्प ते नोव्हेंबर २०२३ मध्ये  एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मांडणार आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact  

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact