- शिवान दर्डा

Image: freepik
तंत्रज्ञान हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. तंत्रज्ञानामुळे जगाशी आपण सतत जोडलेलो असतो. एका बाजूला तंत्रज्ञान प्रगतीसाठी अत्यावश्यक असताना दुसरीकडे डिजिटल डीटाॅक्सचं महत्त्वही जाणून घेणं आवश्यक आहे. डिजिटल डीटाॅक्स म्हणजे ताजंतवानं होण्यासाठीचा अत्यावश्यक विराम आहे. तसेच हा डिजिटल डीटाॅक्स शाश्वत भविष्यासाठीही आवश्यक आहे. तो कसा हे शोधण्यापूर्वी तंत्रज्ञानाची झपाट्याने होणारी प्रगती पर्यावरणासाठी समस्या कशी निर्माण करु शकते हे समजून घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे.
हेही वाचा!
तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर होणारा परिणाम
तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या प्रगतीचा पर्यावरणावर लक्षणीय परिणाम होतो.
१. ऊर्जेचा वापर: तंत्रज्ञानास ऊर्जा ही लागतेच. २००५च्या तुलनेत २०१०मध्ये जगभरातल्या डाटा सेंटरमुळे ऊर्जेच्या वापरात ५६ टक्के एवढी मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली. डाटा सेंटर्सची वाढ ही अशीच होत राहिली तर जगभरातील वीज वापरापैकी १३ टक्के वीज वापर ही केवळ डाटा सेंटरद्वारे होणार आहे. ऊर्जा वापर, वीज वापर जितका वाढणार तितका त्याचा ताण पर्यावरणावर येणारच.
२. इलेक्ट्राॅनिक कचऱ्यात वाढ: २०१९मध्ये जगभरात साधारणपणे ५३. ६ मिलियन मेट्रीक टन एवढा इलेक्ट्रानिक कचरा तयार झाला.
३. नैसर्गिक स्त्रोतांची घट: तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक स्त्रोतांवर ताण पडतो. हे समजून घेण्यासाठी एक स्मार्टफोनचं उदाहरण घेवू. एक स्मार्ट फोन बनवण्यासाठी विविध ५० खनिजं आणि धातू गरजेचे असतात. जमिनीतील निओडिमियम, इंडियम आणि कोबाल्टसारख्या जमिनीतील दुर्मिळ घटकांचा वापर केला जातो. जमिनीतील दुर्मिळ खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात खाणकाम केलं जात आहे. त्याचा पर्यावरणावर लक्षणीय परिणाम होतो. यामुळे जंगल कमी होणे, मातीची धूप होणे, हवा आणि पाण्याचं प्रदूषण अशा पर्यावरणीय समस्या गंभीर रुप धारण करत आहेत.

Image: tstimetologoff
पर्यावरण रक्षणाच्या मदतीसाठी डिजिटल डीटाॅक्सचा पर्याय
हेही वाचा!

Image: acadle
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact