
Image : verywellhealth
टी.व्हीवर एखादा कार्यक्रम बघत असताना जर जाहिरात लागली तर मोठी माणसं त्या जाहिरातींच्या ब्रेकमध्ये उठून आपली कामं करतात आणि जाहिरात संपल्यावर पुन्हा टीव्हीसमोर येवून बसतात. पण लहान मुलं मात्र जाहिरातींकडे टक लावून बघत असतात. कारण बऱ्याचशा जाहिराती या खाण्यापिण्याच्या असतात. चाॅकलेट, आइस्क्रीमच्या जाहिराती बघून बरीच मुलं आई बाबांसोबत बाहेर गेल्यावर त्यांच्याकडे 'काय बरं खायला मागायचं?' याचं प्लॅनिंग करत असतात. तुम्हीही असंच करता का? जरी तुम्ही करत नसला तरी बरीचशी मुलं टीव्हीवरील जाहिरातीत जे बघितलं ते घेवून देण्याचा हट्ट आपल्या आई बाबांकडे करतात. हे फक्त आपल्याकडेच होतं असं नाही, जगात कुठेही जा मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत टीव्हीवर पाहिलेल्या जाहिरातींचे उदाहरण देतात आणि आपल्यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ निवडतात. पण जाहिरातीत जे दाखवलं ते आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं असं नाही, हे कळण्याचं ते वय नसतं. जर चांगलं नाही तर मग टी.व्हीवर कसं बरं दाखवतात, त्या जाहिरातीतल्या मुला मुलींना तर ते खावून काही त्रास झाला नाही, उलट ते आनंदाने किती उड्या मारत होते.. अशा स्वरुपाचे वाद घातले जातात. स्पेन देशातली मुलंही अशीच वागायची. टीव्हीवरल्या जाहिराती बघून फास्ट फूड खाण्याचा आग्रह करायची. यावर उपाय म्हणून त्या देशाच्या सरकारने यावर एक उपाय योजला. तो कोणता?
हेही वाचा!
जंकफूडच्या जाहिरातींवर बंदी
जंकफूडचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्याच्या जाहिराती पाहून त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बिघडतात त्यामुळे टीव्ही, रेडिओ, इंटरनेटवर १६ वर्षांखालील मुलांना लक्ष्य करुन केलेल्या जंक फूडच्या जाहिराती दाखवायच्या नाहीत असा नियम स्पेनच्या सरकारने २०२२ मध्ये केला. स्पेनआधी ब्रिटन सरकारने आपल्या देशात टीव्हीवर रात्री नऊ वाजण्याआधीच्या कार्यक्रमादरम्यान १६ वर्षांखालील मुलांना लक्ष्य करणाऱ्या जंकफूडच्या जाहिराती दाखवायच्या नाहीत असा नियम केला होता. कारण ब्रिटनमध्ये १० ते ११ वर्षांची १४ लाख मुलांपैकी ३५ टक्के मुलं स्थूल होती. लहान मुलांमधील स्थूलता (ओबेसीटी) ही समस्या गंभीर होत होती. त्यावरचा उपाय म्हणून ब्रिटनच्या सरकारने विशिष्ट वेळेतील कार्यक्रमादरम्यान १६ वर्षांखालील मुलांना लक्ष्य करुन करण्यात येणाऱ्या जंक फूडवरील जाहिरातींवर बंदी आणली.

Image: completewellbeing
हेही वाचा!

mage: parenthub
पण स्पेनने ब्रिटन सरकारच्या एक पाऊल पुढे टाकून मुलांना लक्ष्य करुन करण्यात येणाऱ्या जंक फूडच्या जाहिराती टीव्ही, रेडिओ, इंटरनेटवरुन दाखवण्यावर बंदी आणली. चाॅकलेट, आइस्क्रीम, शीतपेयं, केक, पेस्ट्रीज यासारखे पदार्थ चवीला छान लागतात. त्यामुळे ते मुलांना हवेसे वाटतात. आणि जाहिरातीत जर त्यांच्याच वयाची मुलं हे पदार्थ खात पित असतील तर जाहिराती पाहणाऱ्या मुलांनाही ती खावीशी वाटतातच. असे पदार्थ खाऊन आरोग्यावर मात्र विपरित परिणाम होतो. लहान वयात वजन वाढतं. हे टाळण्यासाठी म्हणून आपण हे करत असल्याचं स्पेन सरकारचं म्हणणं आहे. आपलं लक्ष्य आपल्या देशातील मुलांचं आरोग्य सुदृढ करणं, त्यांना ओबेसीटीच्या समस्येपासून वाचवणं असल्याचं या देशाचं ध्येय आहे.
आता टीव्हीवरील जाहिरातीत मुलं चाॅकलेट आइस्क्रीमसारखे जंक फूड खाताना दिसली तरी हे पदार्थ आपण खायचे की नाही, किती खायचे हे आपल्या आरोग्याचा विचार करुन आपल्यालाच ठरवायचं आहे. आलं का लक्षात?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact