हे करून पहा

मोहरी नाचवण्याचा प्रयोग हा काही जादूचा प्रयोग नाही.त्यामागे शास्त्रीय कारण आहे.पण तरीही मोहरी नाचवून आपण मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खाऊ शकतो.
खोडरबरं, शार्पनर आणि स्टेशनरी ठेवायला काही ना काही हवं असतंच. ते विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करा. फुग्यापासून बाऊलची आयडिया कशी वाटते?
चित्र रंगवण्यासाठी क्रेयाॅन्स आपण नेहमीच वापरतो. पण हेच क्रेयाॅन्स वितळवून आकर्षक नक्षी तयार करता येते. चला प्रयोग करुन बघूया!
धान्याला मोड आणणे हा म्हटलं तर अभ्यास किंवा टाइमपासही.हा एक तर आहेच पण यामुळे आपल्याला स्वयंपाकघरात लुडबूड करण्याची परवानगीही मिळते.
आपला पुस्तकांचा कप्पा आवरायचा. नको असलेलं टाकायचं, हवं असलेलं ठेवायचं. वेस्ट मॅनेजमेण्ट सारखा अवघड विषय शिकण्याचा सोपा उपाय !
कपाट उघडलं की अंगावर कपड्यांचा डोंगर कोसळतो ना! हा कपड्यांचा पसारा आवरायला घ्या आणि पसारा आवरण्यातली गंमत काय असते हे अनुभवून बघा!
कपड्यांची देखभाल ही एक कला आहे. रीड्यूस, रीयूज, रीसायकल या मंत्रातली गंमत कळण्यासाठी फाटलेल्या, उसवलेल्या कपड्यांना एक टीप घालून बघा!
आपल्या घरात वस्तूंसोबत जे पॅकिंग येतं ते सामान काढल्यानंतर आपण फेकून देतो. पण फेकून देण्याआधी त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला बरंच काही कळेल!