
Image: adventuresindbad
आपण शाळेत जातो, शाळेतून घरी येतो, क्लासला जातो, आई-बाबांसोबत फिरायला जातो तेव्हा आपल्याला रस्त्यात हमखास भेटते ती म्हणजे गर्दी. वाहनांची भली मोठी रांग, जोरजोरात वाजणारे हाॅर्न्स. जिथे जिथे ट्रॅफिक सिग्नल असतात, तिथे मात्र हा गोंधळ, ही गर्दी नियंत्रित राहाते. पण जिथे ट्रॅफिक सिग्ल नाही, अशा रस्त्यांवर, चौकात लोकं कसेही गाड्या दामटतात. पायी चालणाऱ्यांचा, सायकल वर ये-जा करणाऱ्यांचा तर कोणी विचारही करत नाही. मग रस्त्यांवर अपघात, गाड्यांना धक्का लागून भांडणं ,मारामाऱ्या या गोष्टी होतातच. या सगळ्यामुळे ट्रॅफिक सिग्नल असण्याचं, रहदारीचे नियम पाळण्याचं महत्व आपल्याला पटत जातं. ट्रॅफिक सिग्नलशिवाय ट्रॅफिकला शिस्त लागणं, अपघाताचं प्रमाण कमी होणं अशक्यच आहे... हो ना? फक्त आपल्या देशात नाही तर जगभरात रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीला शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था असते. पण यला एक देश अपवाद आहे बरं का? तो देश म्हणजे भूतान. जगातला हा एकमेव देश आहे जिथे कुठेही ट्रॅफिक सिग्नल नाही. आणि ट्रॅफिक सिग्नल नसतानाही तिथे रस्त्यावर वाहनं शिस्तीत चालतात. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला ना! भूतानमध्ये ट्रॅफिक सिग्नल नसण्यामागे विशिष्टं कारणं आहेत.
हेही वाचा!
भूतानमध्ये ट्रॅफिक सिग्नल का नाही?
हेही वाचा!

Image: aseanrecords
भूतान देशातल्या लोकांसारखं जगातल्या सगळ्याच लोकांनी वागायचं ठरवलं तर सगळीकडे कशी शांतता आणि आनंद असेल ना!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact