१०८ फूट उंचीचा केक! ४००० हिऱ्यांनी सजवलेला. असा केक पाहिला का?

Image: .bakingo

आपल्यापैकी कोणाला केक आवडत नाही? असा प्रश्न विचारला तर 'मला' असं उत्तर कोणीच देणार नाही. कारण केक तर आपल्याला खूप आवडतो. वाढदिवसाला आई बाबांनी आपल्याला काही वेगळं गिफ्ट नाही दिलं तरी चालेल पण वाढदिवसाला आपल्या आवडीचा केक हवाच असा आपला हट्ट असतोच. केक फक्त आपल्यालाच आवडतो असं नाही. जगभरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत केक बहुतेकांना आवडतोच. जगभरातल्या लोकांना आपल्या चवीनं आणि रुपानं वेड लावणाऱ्या या केकचं जगही खूप मोठं आणि अफलातून आहे. केकच्या संबंधित माहिती नसलेल्या गोष्टींसोबतच केकचे अनेक विक्रमही आहेत. केक खाता खाता या केकच्या माहीत नसलेल्या गोष्टीही जाणून घ्यायच्या का?

हेही वाचा!

केकच्या जगातले रेकाॅर्ड्स

केकला अनेक शतकांचा इतिहास आहे. इजिप्तमध्ये पूर्वी देवाला केकचा नैवेद्य दाखवला जायचा. पूर्वी केकचे मोजकेच प्रकार होते पण त्यानंतर केकच्या जगात जगभरातल्या बेकर्सने खूप प्रयोग केले आणि पोत आणि चवीच्या बाबतीत वैविध्य असलेले केकचे अनेक प्रकार जन्माला आलेत. आपण टी.व्हीवर, वर्तमानपत्रात मोठमोठाले केक पाहिलेले आहेत. पण जगातला सर्वात मोठा केक १९८९ मध्ये अमेरिकेतील अल्बामा राज्यातील फोर्ट पायने या शहरात बनवला गेला. या वजनदार केकचं वजन १,२८,२३८ ( एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडतीस) पौंड इतकं होतं. बेकर्सची मोठी टीम हा केक बनवण्याच्या कामी गुंतलेली . एका वेळेस अनेक ओव्हनमध्ये केक बनवले गेले आणि मग ते एका ठिकाणी आणून त्याची अशी रचना केली की त्यातून केकचा वजनदार मास्टर पीस तयार केला गेला.

डेबी विंघम या डिझायनरने ४,००० ( चार हजार) हिऱ्यांनी सजवलेला अतिशय महागडा केक तयार केला. या केकची किंमत होती ३५० लाख डाॅलर्स. हा केक जिभेने आस्वादण्यापेक्षा तो डोळ्यांनी बघण्यात जास्त गंमत होती. कलाकृतीचा उत्तम नमुना असा या केकचा उल्लेख केला गेला.

केकचा उगम ' काका' या पदार्थातून झाला. पूर्वी नाॅर्वेमध्ये 'काका' नावाचा पिठाचा गोड पदार्थ केला जायचा. पुढे या काकालाच केक म्हणू लागले.

 Image: indiatoday

२००४ मध्ये अमेरिकेतील बेकर्सच्या टीमने १०८ फूट आणि ३ इंचाचा केक तयार केला. या केकची नोंद 'गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डसमध्ये जगातला सर्वात उंच केक अशी केली गेली.

मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी, विशिष्ट प्रसंगासाठी खास केक तयार केले जातात. हे खास केक अनेक लेयरचे असतात. त्यावर  अवघड वाटावी अशी कलाकुसर  केलेली असते . अतिशय बारकाईनं सजावटीचं काम केललं असतं. मुळातच केक करणं हे अतिशय वेळखाऊ काम असतं. त्यात असे विशेष केक करायचे असतील तर ते काही एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी अनेक दिवस नव्हे अनेक आठवडेही लागतात.

आता आपल्याला आवडणारा, आपलं लक्ष वेधणारा रेड वेल्व्हेट केक हा मुळत बिटापासून तयार केला होता. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात बेकर्सके केकला विशिष्ट रंग आणि पोत देण्यासाठी बिटाचा वापर केला आणि तेव्हापासून रेड वेल्व्हेट केक लोकप्रिय झाला.

हेही वाचा!

२०१९ मध्ये जोय चेस्टनट यांनी एका स्पर्धेत १२ इंच व्यासाचा केक ३२.९१ सेकंदात फस्त केला.

केकवर जे डेकोरेशन केलेलं असतं ते खाताही येतं. अशा सजावटीला 'पॅटीस्सेरी' असं म्हटलं जातं. पायपिंग, शिल्पकला आणि साखरेची कलाकुसर करुन केकवर डेकोरेशन म्हणजेच पॅटीस्सेरी केली जाते.

आता जगभरात जे केक आहेत ते माॅर्डन केक म्हणून ओळखले जातात. हे माॅर्डन केक जगाला युरोपने विशेषत: रोमन आणि ग्रीक यांनी दिलेत. त्यांनी तयार केलेल्या केकचा प्रसार जगभरात झाला आणि संपूर्ण जगाला केक खाण्याची सवय लावली.  

केक हे चवीला फक्त गोडच असतात असं नाही तर चमचमीत केकही असतात.

प्राचीन ग्रीकमध्ये आर्टेमिस नावाच्या चंद्राच्या देवतेला केकचा नैवेद्य दाखवला जायचा. तो दाखवताना केकच्या भोवती गोलाकार मेणबत्त्या पेटवल्या जायच्या. मेणबत्त्यांमधून निघणाऱ्या धुराद्वारे आपण देवाला केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचते अशी त्यामागची समजूत होती. पुढे काळ बदलला, केकभोवतीचे समज, प्रथा बदलल्या पण केकवर मेणबत्ती मात्र आजही लावली जाते 

Image: pinterest

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact